शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मंगळवारी तब्बल २.५० लाख विद्यार्थी गाणार सामूहिक राष्ट्रगीत

By महेश सायखेडे | Updated: August 7, 2022 18:58 IST

Independence Day: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी सामूहिक राष्ट्रगान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात २.५० लाख विद्यार्थी तसेच सात हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होत राष्ट्रगीत गाणार आहेत.

- महेश सायखेडे वर्धा -  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी सामूहिक राष्ट्रगान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात २.५० लाख विद्यार्थी तसेच सात हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होत राष्ट्रगीत गाणार आहेत.

शहरी व ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा वर्धा जिल्ह्यात जागरच केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमात विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींसह माजी सैनिक तसेच नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थी राहणार शालेय गणवेशातविद्यार्थी आपला शालेय गणवेश परिधान करून या उपक्रमात सहभागी होणारे आहेत.एनसीसी, स्काऊट-गाईड व हरित सेनेचे छात्र सैनिक त्यांच्या गणवेशात सहभागी होतील.क्रीडा संकुलात १४ हजाराहून अधिक गाणार राष्ट्रगीतवर्धा येथील क्रीडा संकुलात होणाऱ्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात दोन हजार कर्मचारी आणि तब्बल १२ हजार विद्यार्थी सहभागी होत सामूहिक राष्ट्रगीत गाणार आहेत.

 मंगळवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जिल्ह्यात सामूहिक राष्ट्रगान उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात २.५० लाख विद्यार्थी सहभागी होणार असून नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे.- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्य.) वर्धा.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन