शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीची वैष्णवी भालेराव 'स्वरवैदर्भी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:27 IST

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित 'स्वरवैदर्भी लिटिल चॅम्प' ....

ठळक मुद्देनागपूरची श्रीया मेंढी, सुमेधा बालपांडे व अवंतिका ढुमणे उपविजेत्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित 'स्वरवैदर्भी लिटिल चॅम्प' विदर्भस्तरीय सिनेगीत गायन महाअंतिम स्पर्धेचे विजेतेपद अमरावतीच्या वैष्णवी भालेराव हिने पटकावले. १६ वषार्खालील बालकुमारांच्या या स्पर्धेची उपविजेता नागपूरची श्रीया मेंढी ठरली. तृतीय पुरस्काराचा सन्मान सात वर्षाची सुमेधा बालपांडे (नागपूर) आणि अवंतिका ढुमणे (वर्धा) या बालगायिकांना प्राप्त झाला.सावंगीच्या विद्यापीठ सभागृहात आयोजित या महाअंतिम स्पर्धेचे उदघाटन कुलपती माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते झाले. यावेळी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रकुलपती आनंदवर्धन शर्मा, शरद पवार दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक पखान उपस्थित होते. महाअंतिम स्पर्धा जुनी लोकप्रिय गाणी, एकविसाव्या शतकातील गाणी आणि मराठी लोकधारा अशा तीन फेºयात घेण्यात आली.संस्थेच्या विश्वस्त शालिनी मेघे, द.मे. आयुर्विज्ञान संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर इंगळे, व्ही. आर. मेघे, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबाजी घेवडे, स्वरवैदभीर्चे संयोजक संजय इंगळे तिगावकर, सहसंयोजक सुनील राहाटे, परीक्षक गण नरेंद्र माहुलकर, संजय नाशिरकार, केतकी कुळकर्णी, अविनाश काळे, शशिकांत बागडदे, भारती भांडे-कदम यांच्या हस्ते 'स्वरवैदर्भी' सन्मानचिन्हासह रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सर्व स्पर्धकांना गौरविण्यात आले.स्पर्धेतील गायकांना शैलेश जगताप, चारू साळवे, दिनेश गवई, राजेंद्र झाडे, रवी ढोबळे, रितेश गुजर, निखिल झिरकुंटलवार यांनी उत्कृष्ट संगीतसाथ केली. संपूर्ण स्पर्धेचे संचालन मुबारक मुल्ला यांनी केले. या आयोजनात संगीता इंगळे, देवेंद्र गुजरकर, राजेश सव्वालाखे, पंकज अडेकर, राहुल तेलरांधे, हेमंत पुंडकर, सागर खोडे, विजय खैरे यांचे सहकार्य लाभले.नऊ जणांना प्रोत्साहनपर पुरस्कारप्रथम द्वितीय आणि तृतीय पुरस्काराशिवाय उन्मेषा वानखडे (अकोला), देवश्री चिमोटे, निधी गायकवाड (अमरावती), दिव्या शेंडे (कळंब यवतमाळ), अनुराग जाधव (कारंजा लाड), देवांश दुपारे, प्रांजल धोटे, मिताली कोहाड, स्वप्नमोय चौधरी (नागपूर) या बालकुमार गायकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला.