शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दारूसह ३.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: July 24, 2015 01:53 IST

दारूबंदीच्या निर्णयाला काळ लोटला; पण गांधी जिल्ह्यातील दारू हद्दपार होताना दिसत नाही.

आॅपरेशन वॉश आऊट : शहर ठाणे व पोलीस मुख्यालयाची कारवाईवर्धा : दारूबंदीच्या निर्णयाला काळ लोटला; पण गांधी जिल्ह्यातील दारू हद्दपार होताना दिसत नाही. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशावरून शहरात ‘आॅपरेशन वॉश आऊट’ राबविले जात आहे. यात आठवड्यातून किमान एक-दोन वेळा पोलिसांद्वारे आनंदनगर, पुलफैल भागात ही कारवाई केली जात आहे; पण तेथे प्रत्येक कारवाईत जवळपास तेवढेच साहित्य व दारू आढळून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात गुरूवारी आनंदनगर, पुलफैल व इतवारा परिसरात आॅपरेशन वॉश आऊट राबविण्यात आले. पोलीस निरीक्षक एम.पी. बुराडे, व्ही.आर. मगर, पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस मुख्यालयाचे ४५ कर्मचारी यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. यात रेल्वेलाईन भागात जमिनीत गाडून असलेले गावठी दारू गोळण्याकरिता तयार केलेले रसायन व भट्टी साहित्य आढळून आले. कारवाईत दारू गाळणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी सडवा रसायन, मोहा दारू तसेच दारूच्या भट्ट्या व साहित्य नष्ट करण्यात आल्या. या कारवाईत २०० लिटरचे २३ लोखंडी ड्रम, १०० लिटरचे २५ प्लास्टिकचे ड्रम आणि १२ काळ्या बुडाचे लोखंडी ड्रम, दारूभट्टीचे इतर साहित्य, सरपण आदी साहित्य जप्त करण्यात आले. शिवाय एकूण १० हजार ७०० लिटर रसायन, सडवा व दारू नष्ट करण्यात आली. दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये ३ लाख ८७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.(कार्यालय प्रतिनिधी)दररोज निघते लाखो लिटर दारूशहरातील आनंदनगर, पूलफैल आणि इतवारा परिसरात शहर पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांद्वारे जवळजवळ दररोजच आॅपरेशन वॉश आऊट अंतर्गत कारवाई केली जाते. नित्यनेमाने होत असलेल्या या कारवाईमध्ये तेवढेच साहित्य जप्त होत असून सडवा, रसायन व दारू नष्ट केली जाते. असे असले तरी दररोज तेवढेच साहित्य पुन्हा आढळून येत असल्याने लाखो लिटर दारू गाळल्या जात असल्याचेच दिसते. या प्रकारावरून कारवाईची भीतीच परिसरात राहिली नसल्याचे दिसून येते. यासाठी कठोर उपाययोजना करणेच अगत्याचे झाले आहे.