शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांना जात न मानणारा समाज निर्माण करायचा होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

डॉ. आंबेडकर पूर्व तयारी करून चळवळी उभ्या करीत होते. आज पूर्व तयारी न करता चळवळी उभ्या केल्या जातात. त्यामुळे चळवळीला अपयश येते. जयभीम म्हटल्यांनी जयभीम वाला होत नाही. ते कृतीतून दिसला पाहिजे, असेही यावेळी डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले. प्रशांत कुत्तरमारे यांनी महापुरूषांची चळवळ पुढे नेण्याकरिता नवीन चळवळ निर्माण करायची गरज असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देडॉ. ऋषिकेश कांबळे : सहाव्या आंबेडकरी विचार परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जन्म घेणे हे पूर्वाश्रमीचे फळ ही मानसिकता होती. ती बदलविण्याचे काम डॉ. आंबेडकर यांनी केले. चातुवर्ण व्यवस्था निर्माण करून मनुस्मृती प्रमाणे राज्य कारभार चालविल्या जात होता, ती मनुस्मुती जाळण्यापूर्वी डॉ. आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला रायगडावर जाऊन अभिवादन केले. मानवमुक्तीची चळवळ महात्मा फुलेंनी केली. डॉ. आंबेडकर त्या चळवळीचे कळस झाले. ते मानवमुक्तीचे प्रणेते आहेत. त्यांना भारतात जात न मानणारा समाज निर्माण करायचा होता, असे विचार डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले.परिवर्तनधारा साहित्य कला मंच, वर्धा द्वारा आयोजित सहाव्या आंबेडकरी विचार परिषदेचे उद्घाटन बुधवारी झाले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुत्तरमारे, परिवर्तनधारा साहित्य कला मंचचे अध्यक्ष प्रा. राजेश डंभारे, प्रा. प्रशांत जिंदे यांची उपस्थिती होती.डॉ. आंबेडकर पूर्व तयारी करून चळवळी उभ्या करीत होते. आज पूर्व तयारी न करता चळवळी उभ्या केल्या जातात. त्यामुळे चळवळीला अपयश येते. जयभीम म्हटल्यांनी जयभीम वाला होत नाही. ते कृतीतून दिसला पाहिजे, असेही यावेळी डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले. प्रशांत कुत्तरमारे यांनी महापुरूषांची चळवळ पुढे नेण्याकरिता नवीन चळवळ निर्माण करायची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा. राजेश डंभारे यांनी केले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन मुकुंद नाखले यांनी केले. प्रकाश कांबळे यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार प्रा. चरण गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. प्रवीण वानखेडे, प्रा. महेंद्र वानखेडे, दीपक कांबळे, जीवन निमसडकर, डॉ. हरिष पेटकर, सुभाष चंदनखेडे, डॉ. अनिता ताकसांडे, डॉ. माधुरी झाडे, सावित्री सोनटक्के, सीमा पाटील, आरती सोनारकर, कांचन अवथरे, पल्लवी पाटील, हरिका ढाले, कैलास भगत, मिलिंद पाटील, अ‍ॅड. अविनाश भगत, दिनेश भगत, दिनेश वाणी, प्रकाश जिंदे, संदीप कांबळे, जय उके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर