शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

आंबेडकर जयंती राष्ट्रीय दिन म्हणून साजरी व्हावी

By admin | Updated: April 16, 2017 00:57 IST

देशात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय दिन म्हणून साजरे केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली.

रविकांत तुपकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा थाटात समारोपवर्धा : देशात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय दिन म्हणून साजरे केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. मग बाबासाहेबांचा जयंती दिन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला पाहिजे. यासाठी आपण केंद्र शासनाकडे मागणी करणार असल्याचे प्रतिपादन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे शुक्रवारी केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त वर्धा शहरातील पोलीस ग्राऊंडवर झालेल्या भव्य सोहळयात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. वर्धा शहर उत्सव समितीच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शहर उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद राऊत उपस्थित होते.याप्रसंगी रविकांत तुपकर यांनी आजच्या राजकारणातील अनेक विसंगतीवर बोट ठेवत तरुणांनी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवावे आणि नेत्याच्या मागे मागे करणे सोडून शिक्षण घेतले पाहिजे. विधायक कामे करावीत आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवावा, असे आवाहनही यावेळी तुपकर यांनी केले. रुग्णवाहिकेचे लोकार्पणडॉ बाबासाहेब आंबेडकर शहर उत्सव समितीकडून आणि भीम टायगर संघटनेकडून यावेळी एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. ही रुग्णवाहिका २४ तास वर्धेकरांच्या सेवेत असणार आहे. हा लोकार्पण सोहळा जिजाबाई राऊत, नगरसेविका पद्मावती रामटेके यांच्या हस्ते पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समितीतर्फे मनोरंजनासोबत व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी विविध क्षेत्रातील्या मान्यवरांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने वर्धेकरांनी उपस्थिती दर्शविली होती.(जिल्हा प्रतिनिधी)भीमशाहीने आंबेडकरी जनता मंत्रमुग्धप्रबोधनात्मक कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी ‘भिमशाही’ हा भीमगितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात उत्कर्ष शिंदे व त्यांच्या संचाने एकापेक्षा एक असे सरस भीमगीत सादर केल्याने आंबेडकरी जनता मंत्रमुग्घ झाली होती. या कार्यक्रमासाठी पोलीस ग्राऊंड आंबेडकरी जनतेने खचाखच भरला होता. रात्री १२ वाजतापर्यंत चाललेला कार्यक्रम जसजसा बहरत गेला. तसतशी कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. अखेरच्या क्षणी युवक जागीच थिरकायला लागले.