गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडेघोराड : ग्रामपंचायतच्या उत्पन्नातून गावातील अपंगांना ३ टक्के निधीचे वाटप त्वरित करावे, अशी मागणी सेलू येथील प्रहार संघटनेने केली आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.गत तीन वर्षांचा हा निधी घोराड ग्रामपंचायतने अपंग व्यक्तींना वितरित केला नाही. यावेळी गटविकास अधिकारी अनीता तेलंग यांनी घोराडचे ग्रामविकास अधिकारी संजय धावडे यांना बोलवून शिष्टमंडळासोबत चर्चा केली. अपंग व्यक्तींना ८० हजारांच्या आसपास निधीचे वितरण करावयाचे आहे. यात ३७ अपंग व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगितले. हे वाटप येत्या दोन दिवसांत करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास अधिकाऱ्याने दिले. आश्वासनानुसार दोन दिवसांत या निधीचे वितरण झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे सेलू तालुका संघटक मिलिंद गोमासे यांनी दिला. यावेळी स्वप्नील माहुरे, विवेक घोंगडे यांच्यासह पदाधिकारी व काही लाभार्थी उपस्थित होते.(वार्ताहर)
अपंग व्यक्तींना तीन टक्के निधीचे वाटप करा; प्रहारची मागणी
By admin | Updated: May 24, 2016 02:15 IST