धम्मसेन : एकता रॅलीचे रिपाइंद्वारे ज्ञानेश्वरनगरात स्वागत, धम्मकुटी येथे मार्गदर्शन कार्यक्रमवर्धा : एक विचार, एक भूमिका आणि एकच निर्माता असलेल्या समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया एका सुत्रात एकत्रितपणे कार्यान्वित व्हावी. विलगता आणि परस्पर हेवेदावे यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. हे केवळ समाजाच्याच नव्हे तर त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक संदर्भातही अहिताचे आहे. काळ कधीच कुणाला क्षमा करीत नाही. त्याचे परिणाम निश्चित दिसतात. काळ व समाजाची गरज लक्षात घेऊन बाबासाहेबांच्या समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन भदन्त धम्मसेन यांनी केले.ेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाच्या ऐक्यासाठी दिक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी दादर, मुंबई येथे निघालेल्या एकता रॅलीचे स्वागत रिपाइं नेते विजय आगलावे, महेंद्र मुनेश्वर आदी कार्यकर्त्यांनी केले. यानंतर ज्ञानेश्वरनगर मसाळा धम्मकुटी येथे कार्यक्रम पार पडला. रूषी नागदेवते यांच्यावतीने एकता रॅलीचे मार्गदर्शक भदन्त धम्मसेन, भिक्षू संघ तसेच मुख्य आयोजक देशराज मघाळे आणि सहभागी कार्यकर्त्यांना भोजनदान करण्यात आले.एकता रॅलीमध्ये नव्या समाज, भारत व जगाच्या निर्मितीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तीनही संघटनांनी एकत्रितरित्या सहभागी व्हावे, असा नम्र आग्रह असल्याचे मघाळे यांनी सांगितले.धम्मकुटी येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं नेते विजय आगलावे तर प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे संघटक कर्नल अशोक खन्नाडे, अजय मेहरा, अॅड. राजेश थूल, देविदास भगत, प्रकाश पाटील, रवी गणवीर, सतीश इंगळे, नागोराव शंभरकर, उमेश गायकवाड, मोहन वनकर, सिद्धार्थ नगराळे, माणिक ताकसांडे, रूषी नागदेवते, सुभाष कांबळे, मनीषा कांबळे, राजेंद्र नाखले उपस्थिती होते. आयोजक रिपाइंचे प्रचार व प्रसार प्रमुख महेंद्र मुनेश्वर यांनी प्रास्ताविकातून समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष ऐक्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर येथून निघालेली एकता रॅली क्रांतिकारी विचाराने दादर चैत्यभूमीला ६ डिसेंबर रोजी पोहोचत आहे. आंबेडकरी रिपाइंच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन रिपाइंच्या ऐक्याकरिता पूढे निघाली आहे. या मंगलमय एकता रॅलीला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला शेकडो समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बौद्ध उपासक महिला व पुरूष यांची उपस्थिती होती. आभार आगलावे यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)
बाबासाहेबांच्या तीनही संघटनांनी एकत्रित कार्य करावे
By admin | Updated: October 19, 2016 01:29 IST