शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

मापारी-हमाल गट वगळता सर्वच जागा युतीच्या हाती

By admin | Updated: July 10, 2015 00:24 IST

सहकारी संस्था मतदार संघातून ११ संचालक निवडून द्यायचे होते. यात सर्वसाधारण सात, महिला दोन, इतर मागासवर्गीय एक, विमुक्त भटक्या जमाती एक तसेच ग्रामपंचायत मतदार संघातून ...

देवळी : सहकारी संस्था मतदार संघातून ११ संचालक निवडून द्यायचे होते. यात सर्वसाधारण सात, महिला दोन, इतर मागासवर्गीय एक, विमुक्त भटक्या जमाती एक तसेच ग्रामपंचायत मतदार संघातून चार आणि मापारी-हमाल मतदार संघातून एका जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.बाजार समितीतील एकूण १८ संचालकांपैकी यापूर्वी व्यापारी व अडते मतदार संघातून सुशिल तिवारी व नटवरलाल मोकाती यांची अविरोध निवड करण्यात आली. सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटात संजय झन्नाबापू कामनापुरे १६१ मते, विजयशंकर अजाबराव बिरे २३८, प्रवीण प्रभाकर ढांगे २३८, मनोहर शंकरराव खडसे २३८, राजाभाऊ गंगाधरराव खेडकर २३४, अमोल शंकरराव कसनारे २३१, सैय्यद अयुबअली महमदअली २२५, महिला मतदार गटात शुभांगी संजयराव ढुमणे २५७, इंदूबाई शंकरराव ठाकरे २५६, इतर मागासवर्गीय मतदार गटात प्रदीप बाबाराव लुटे २४८, विमुक्त जाती भटक्या जमाती गटात श्रीधर विठोबाजी लाभे २५३ आदींनी विजय संपादीत केला. या मतदार संघातील ४०० पैकी ३९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटात संजय मारोतराव लांबटे २६३, प्रमोद ज्ञानेश्वर वंजारी २५४, अनुसूचित जाती जमाती गटात देवानंद वामणराव भगत २३३ तसेच आर्थिक दुर्बल घटक गटातून मंगेश अरविंद वानखेडे २५६ यांनी विजय संपादीत केला. या मतदार संघातील ४८७ पैकी ४७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हमाल मापारी मतदार संघातून अशोक नारायणराव पराळे २८ यांनी विजय मिळविला. या मतदार संघातील ४६ पैकी ४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.प्रारंभी अटीतटीची वाटणारी सेवा सहकारी संस्था मतदार गटातील निवडणूक युतीच्या उमेदवारांनी अर्ध्याधिक फरकाने बाजी मारून भाजपाला मात दिली. ग्रामपंचायत मतदार संघामध्ये भाजपा उमेदवारांनी लढत दिल्याने युतीच्या उमेदवारांना ३० ते ४० मतांच्या फरकाने विजय प्राप्त करता आला. जि.प. च्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी या निवडणुकीदरम्यान जीवाचे रान केल्याची चर्चा आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक एस.पी. गुघाणे तर सहायक अधिकारी म्हणून एस.डब्ल्यू कोपुलवार यांनी कामकाज सांभाळले.(प्रतिनिधी)