शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व प्रलंबित रेल्वे उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: July 17, 2015 02:12 IST

जिल्ह्यातील रेल्वे उड्डाण पुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे सर्वच उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

रामदास तडस : सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभागाची बैठकवर्धा : जिल्ह्यातील रेल्वे उड्डाण पुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे सर्वच उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. मंगळवारी स्थानिक विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यात खासदारांनी पुलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. शिवाय प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत, असे निर्देशही दिलेत.विश्रामगृहात खा. तडस यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीला बांधकाम विभाग व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. प्रामुख्याने वर्धा शहरातील बजाज चौक येथील वर्धा उड्डाण पुलाचे विस्तारिकरण, सिंदी रेल्वे येथील उड्डाण पूल, पुलगाव शहरातील उड्डाण पूल, केंद्र शासनाद्वारे अनुदानित केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली विविध विकास कामे, स्थानिक खासदार निधी अंतर्गत विकास कामे तसेच वर्धा जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व कामांचा आढावा खा. तडस यांनी बैठकीत घेतला. शिवाय प्रलंबित कामे मार्गी लावण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले.बजाज चौकातील रेल्वे उड्डाण पुलांच्या विस्तारीकरणाला केंद्र शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. काही किरकोळ तांत्रिक कारणांमुळे सदर प्रस्ताव रेल्वे विभागाकडे प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावर त्वरित तोडगा काढून प्रस्ताव विनाविलंब मंजूर करण्याच्या सूचनाही खा. तडस यांनी बैठकीमध्ये रेल्वे प्रशासनाला दिली. शिवाय अन्य कामेही जलदगतीने करण्याकरिता प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनाला दिले.बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता बालपांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धाचे कार्यकारी अभियंता चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वीचे जुमडे, रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)