लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिला आणि वाशीम जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला रुग्ण अशा दोन व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोन्ही कोरोना बाधितांच्या निकट संपर्कात आलेल्या एकूण ५९ व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व स्वॅब कोरोना निगेटिव्ह आल्याने वर्धा जिल्ह्यावरील मोठे संकट सध्या टळले आहे.आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे तर सावंगी (मेघे) येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. हिवरा तांडा प्रकरणातील २८ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी २३ व्यक्तींचा अहवाल सोमवारी रात्री उशीरा प्राप्त झाला होता. हे २३ व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आले. तर उर्वरित पाच व्यक्तींच्या नमुन्यांचा अहवाल मंगळवारी रात्री उशीरा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला असून याही व्यक्तींना कोरोनाची लागण नसल्याचे अहवालात नमूद असल्याचे सांगण्यात आले. तर वाशीम जिल्ह्यातील रहिवासी असलेला एक ६४ वर्षी रुग्ण उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल झाला. तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येताच त्याच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी १८ व्यक्तींचा कोरोना निगेटिव्ह म्हणूनचा अहवाल सोमवारी रात्री उशीरा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला होता. तर उर्वरित १३ व्यक्तींचा अहवाल मंगळवारी रात्री उशीरा आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून याही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली नसल्याचे पुढे आले आहे. असे असले तरी या सर्व व्यक्तींना दक्षता म्हणून १४ दिवसांपासून क्वारंटाईन करण्यात आले आहे. शिवाय त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून पाळत ठेवली जात आहे.
दोन्ही कोरोना रुग्णाच्या निकट संपर्कातील सर्व व्यक्ती कोविड निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे तर सावंगी (मेघे) येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. हिवरा तांडा प्रकरणातील २८ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आले.
दोन्ही कोरोना रुग्णाच्या निकट संपर्कातील सर्व व्यक्ती कोविड निगेटिव्ह
ठळक मुद्देमोठा धोका टळला : प्रलंबित अहवाल प्राप्त झाले रात्री उशिरा