पशुपालकांना दिलासा : वर्षभरापासून पद होते रिक्तअल्लीपूर : येथे वर्ग-१ प्रथम श्रेणीतील पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. मात्र एक वर्षापासून येथील अधिकाऱ्याचे पद रिक्त होते. येथील कार्यभार प्रभारी असल्याने पशुपालाकांना नाहक त्रास सहन करावा लागत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत येथे नियमीत पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले असल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.येथील शेतकऱ्यांनी जनप्रतिनिधी व प्रशासन यांच्या निदर्शनास ही बाब आणुन दिली. मात्र याकडे दुर्लक्ष केले. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित करून समस्येचा पाठपुरावा केला. अखेर अल्लीपूर येथे पूर्णवेळ व नियमित अधिकारी म्हणून डॉ. अमित लोहकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल वर्षभरापासून येथील पद प्रभारी असल्याने येथे १२ डॉक्टर आले. मात्र यापैकी एकालाही रुजू करण्यात आले नाही. कधी हिंगणघाट तर कधी सिरजगाव येथील डॉक्टरांकडे प्रभार असत. याचा पशुपालकांना त्रास होत वेळेवर उपचार मिळत नसल्याने जनावरे दगावत. परिसरातील १५ गावांना या पशुवैद्यकीय रुग्णालयासोबत जोडण्यात आले आहे. शवविच्छेदन करण्यासाठी तळेगाव येथून डॉक्टरांना बोलवावे लागत. यात विलंब झाल्यास विम्याची रक्कम व प्रमाणपत्र मिळविण्यात गोपालकांना त्रास सहन करावा लागत. यामुळे गोपालकांना दिलासा मिळाला आहे.(वार्ताहर)
अल्लीपूरला नियमित पशुवैद्यकीय अधिकारी
By admin | Updated: November 19, 2015 02:48 IST