शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

२६.७१ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:16 IST

पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी वन विभागाला पार पाडावी लागते.

ठळक मुद्देराऊंड नेट-शेडच्या रोपवाटिका सज्ज

प्रशांत हेलोंडे ।ऑनलाईन लोकमतवर्धा : पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी वन विभागाला पार पाडावी लागते. यासाठी वन विभागाकडून रोपवाटिका तयार केल्या जात आहेत. यंदा जिल्ह्यात २६ लाख ७१ हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी वन विभागाने तयारी चालविली आहे.रोपांची उपलब्धता व्हावी म्हणून जिल्ह्यात रोपवाटिका सज्ज केल्या जात आहेत. सध्या पाच गावांत सुसज्ज रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. या नर्सरीमध्ये पाच राऊंड नेट शेड तयार करण्यात आले असून प्रत्येकी ८५ हजार रोपांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या माध्यमातून ४ लाख २५ रोपे उपलब्ध होणार आहेत. अशा रोपवाटिका जिल्ह्यातील प्रत्येक वनपरिक्षेत्रात तयार करण्यात येत आहेत. यासाठी वनविभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ तथा वन व्यवस्थापन समिती प्रयत्नरत आहे.जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राऊंड नेट शेडच्या माध्यमातून रोपे तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी वर्धा, तळेगाव (श्या.पं.) वनपरिक्षेत्रातील जसापूर, कारंजा (घा.) क्षेत्रातील आमदरी, आर्वी क्षेत्रातील सारंगपुरी आणि समुद्रपूर क्षेत्रातील आजदा या पाच गावांत रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहे. सन २०१८ च्या पावसाळ्यात वर्धा जिल्ह्याला २६ लाख ७१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. कुठेही रोपांची कमतरता भासू नये म्हणून तब्बल ३० लाख रोपे तयार करून ठेवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वन विभागाच्या रोपवाटिकांमध्ये रोपांची लागवड करण्यात येणार आहे. शिवाय अन्य वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्नही वन विभागाकडून केले जाणार आहेत. वनविभाग रोपवाटिका भक्कम करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे.वनविभाग करणार ७.९५ लाख वृक्षांचे रोपणयंदाच्या पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यात २६ लाख ७१ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाने रोपे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. शासकीय तथा निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांनाही वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यात वन विभागाद्वारे ७ लाख ९५ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. सामाजिक वनीकरणमार्फत ७ लाख, ग्रा.पं. च्या माध्यमातून ६ लाख ३० हजार तर अन्य शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांच्याकडून १३ लाख ८२ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.स्थळ निश्चितीचे काम सुरूजिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी वृक्ष लागवड करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून जागा निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांचे यासाठी मार्गदर्शन घेतले जात असल्याची माहिती वन विभागाने दिली.रोपवाटिकांचेही होणार सक्षमीकरणआजपर्यंत वन विभागाच्या रोपवाटिका त्या-त्या वनपरिक्षेत्र कार्यालय तथा अन्य शासकीय जमिनीमध्ये तयार केली जात होती. आता रोपवाटिकांचेही सक्षमीकरण वन विभागाकडून करण्यात येत आहे. यासाठी सध्या पाच गावांत प्रायोगिक तत्वावर काम सुरू करण्यात आले आहे. राऊंड नेट शेडच्या माध्यमातून ही रोपे तयार केली जाणार असून वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होईल, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.