शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून केली शेती

By admin | Updated: February 8, 2016 02:15 IST

येथील सरकारी आबादीच्या ८१ आर जमिनीवर येथील एका शेतकऱ्याने अतिक्रमण केले.

शेतकऱ्यांची वहिवाट अडली : दीड वर्षांपासून प्रकरण धूळ खातकारंजा (घाडगे): येथील सरकारी आबादीच्या ८१ आर जमिनीवर येथील एका शेतकऱ्याने अतिक्रमण केले. त्याने या जमिनीवर शेती करणे सुरू केल्याने येथून जाणारा रस्ता बंद झाला. यामुळे एकूण चार शेतकऱ्यांची त्यांच्या शेतात जाणारी वहिवाट बंद झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून अतिक्रमण काढण्याच्या सूचना खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. असे असताना येथील नायब तहसीलदाराकडून यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या अतिक्रमणाला या अधिकाऱ्याचे पाठबळ असल्याची ओरड होत आहे. त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही अधिकाऱ्यांनी केली आहे. शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने अडचणीत आलेल्या चार शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे पत्र दिले. त्याच्या स्मराणाकरिता दोन वेळा पत्रव्यवहार केला. असे असताना संबंधीत नायब तहसीलदाराकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे या अतिक्रमणालाा या अधिकाऱ्याचे पाठबळ असल्याची ओरड गावात होत आहे. मंडळ अधिकाऱ्याने चौकशी करून शासकीय जमिनीवर जेसीबीद्वारे खोदकाम करून ती ताब्यात घेत त्यावर पेरणी केल्याचा अहवालही तहसीलदारांना दिला आहे. तसे माहिती अधिकारातही पुढे आले आहे. त्या जागेवर संत्रा झाडे सुध्दा लावलेली, असल्याचा पुरावा आहे. या सर्व प्रकारामुळे तक्रारकर्ते शेतकरी मारोती करमधार, भाऊराव बेलखेडे, गणपत सरोदे व किशोर मोकदम रा. कारंजा या चार शेतकऱ्यांचा पुढील शेतात जाणारा वहीवाटीचा रस्ता बंद झाला आहे. याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) गाव नकाशानुसारही जागा शासकीय कारंजा गाव नकाशा नमुनानुसार सर्व्हे क्रमांक १०२९, १०३०, १०३१ व १०३२ च्या मध्ये एल चिन्हाचे दर्शविलेली सरकारी आबादीची ८१ आर एवढी जागा आहे. भूमिअभिलेख वेळपत्रकामध्ये जुन्या प्रस्थापनानुसार सर्वे नं. ४८४/३ क, ४८४/३ ख आणि ४८४/१ग ही जागा ०.८१ हे. आर असून सध्या एल ने दर्शविलेली सरकारी आबादीची जागा म्हणून नोंद आहे. निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने याच रस्त्याच्या हक्काबाबत सन २००० मध्ये या चार शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा म्हणून कारंजा तहसील कार्यालयात प्रकरण दाखल केले होते. तेव्हा या शेतकऱ्यांचे बाजूला निकाल लागला होता. असे असतानाही त्यावर अद्याप कारवाई झाली नाही.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेलाही बगलरस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रावरून नायब तहसीलदार काचोरे व तहसीलदार जोशी यांना अतिक्रमण त्वरीत हटविण्याबद्दल व रस्ता मोकळा करून देण्याबद्दल सुचविले. याला दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही कारवाई झाली नाही. सदर प्रकरण नायब तहसीलदार गणेश बर्वे यांच्याकडे आहे. मी प्रभारी तहसीलदार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा सरकारी जमिनीवरील अतिक्रमण कायदेशीररित्या त्वरीत हटवून शेतकऱ्यांना शेतवाट मोकळी करून द्यावी असे सुचविले आहे. त्यानुसार भूमि अभिलेख अधिकारी संबंधीत अर्जदार शेतकरी व गैरअर्जदार बोलावून त्वरीत कारवाई करतो असे आश्वासन दिले आहे. - मिलिंद जोशी, तहसीलदार, कारंजा (घा.)