शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनमुळे शेतीच आली संकटात

By admin | Updated: November 2, 2014 22:44 IST

अतिवृष्टी व नापिकीमुळे सोयाबीन यंदा परवडत नसल्याचे दिसते़ सोयाबीनच्या अत्यल्प उताऱ्याने शेतकऱ्यांची शेतीच संकटात आल्याचे चित्र आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्वी उपविभागातून

आवक आली निम्म्यावर : पाच दिवसांत केवळ २ हजार ११७ पोत्यांची आवकआर्वी : अतिवृष्टी व नापिकीमुळे सोयाबीन यंदा परवडत नसल्याचे दिसते़ सोयाबीनच्या अत्यल्प उताऱ्याने शेतकऱ्यांची शेतीच संकटात आल्याचे चित्र आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्वी उपविभागातून होणारी सोयाबीनची आवक निम्म्यावर आली आहे. गत पाच दिवसांत आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ २ हजार ११७ पोत्यांची आवक झाली आहे़ मागील वर्षी हा आकडा १५ हजारांच्या वर होता. तीन वर्षांपासून दुष्काळसदृश्य स्थिती असून नैसर्गिक प्रकोप वाढला आहे़ यातच प्रथम पावसाची दडी व नंतर अतिपाऊस यामुळे सोयाबीन व कपाशीची वाताहत झाली़ यावर्षी सोयाबीनची आराजी एकरी एक ते तीन पोते एवढी अत्यल्प आहे़ काहींना सोयाबीन पीक सवंगण्याची गरजच भासली नाही. ४ हजारांचे सोयाबीन काढण्यासाठी ६ हजारांचा खर्च, अशी स्थिती आहे़ यंदा आर्वी बाजार समितीची सोयाबीन खरेदी २७ नोव्हेंबरपासून सुरू झाली. शुभारंभ दिनी २६० पोत्यांची आवक झाली. दि़ २८ रोजी १७५, दि़ २९ ला ४२०, दि़ ३१ ला ५५६ तर १ नोव्हेंबरला ६०६ अशी पाच दिवसांत केवळ २ हजार ११७ पोत्यांची आवक झाली. मागील वर्षी ही आकडेवारी व आवक १५ ते १७ हजारांवर होती. यंदा ती निम्मीही झाली नसल्याने बाजार समितीत शुकशुकाट पसरला आहे़ यावर्षी सोयाबीनला उतारा नाही आणि भाव २६५० ते ३५०० एवढाच आहे. नापिकी व सततच्या पावसाने सोयाबीनची प्रतवारी खराब होऊन सोयाबीनचा दाणा बारिक झाला़ कमी-अधिक पाऊस झाल्याने शेतकरी सोयाबीन साठवूनही ठेऊ शकत नसल्याने शेतातून माल निघताच तो विकण्याशिवाय गत्यंतर नाही. अत्यंत कमी उतारा आणि अत्यल्प भाव, यामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्चही भरून निघत नसल्याचे दिसते़ अनेक शेतकरी सोयाबीन सवंगणारच नसल्याचेही दिसते़(तालुका प्रतिनिधी)