शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायक ते कृषी संचालक आंदोलनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:38 IST

कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील कृषी सहायक ते कृषी संचालक या क्षेत्रीय व कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. सात टप्प्यात सदर आंदोलन होणार आहे. प्रशासनात दुय्यम स्थान देण्यात आल्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे११ ला दुसरा टप्पा : राज्यात सात टप्प्यात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील कृषी सहायक ते कृषी संचालक या क्षेत्रीय व कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. सात टप्प्यात सदर आंदोलन होणार आहे. प्रशासनात दुय्यम स्थान देण्यात आल्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ३ सप्टेंबरपासून शासनास सादर करण्यात येणारे अहवाल थांबवून असहकार पुकारण्यात आले आहे. कृषी विभागाचे मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत संपाची नोटीस देण्यात आली आहे.शासकीय योजनाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या दमबाजी, मारहाण आदीपासून पोलीस संरक्षण मिळणे व पाटण येथील कृषि अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक व्हावी. तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी व दर्जेवाढीबाबत केंद्र शासनाच्या विविध समित्यांनी केलेल्या शिफारसी स्वीकाराव्यात. डबलींग फार्मर्स इनकम कमिटीच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी. कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध पिरॅमिडीक तयार करताना महासंघास विश्वासात घेण्यात यावे. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्मा कार्यालय कायम ठेवण्यात यावे आदी मागण्याचा समावेश आहे.आंदोलनाचे टप्पेमागणीची नोटीस देणे ३ सप्टेंबर, काळ्या फिती लावून शासकीय कामकाज करणे ११ ते २३ सप्टेंबर, लेखणीबंद आंदोलन- २४ सप्टेंबर ७ आॅक्टोबर, जिल्हास्तरीय मोर्चा ८ आॅक्टोबर, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे ९ आॅक्टोबर, साखळी उपोषण १० ते २१ आॅक्टोबर, बेमुदत संप २२ आॅक्टोबरपासून करणार आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी