शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अडतबंदीच्या स्थगितीने शेतकरी संकटात

By admin | Updated: December 25, 2014 23:36 IST

गुजरात तसेच राजस्थान या राज्यांमध्ये खरेदीदार व्यापारी अडत देतात. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मात्र अडत लादली जात आहे. त्यामुळे एकाच देशात दोन निर्णय वेगवेगळे कसे असा

वर्धा : गुजरात तसेच राजस्थान या राज्यांमध्ये खरेदीदार व्यापारी अडत देतात. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मात्र अडत लादली जात आहे. त्यामुळे एकाच देशात दोन निर्णय वेगवेगळे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी पूर्वीच दुष्काळाच्या छायेत असताना त्यांच्याप्रती सकारात्मक निर्णय घेण्याऐवजी नकारात्मक घेतलेल्या अडतबंदी स्थगितीचा महात्मा समता परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. आदेशाला दिलेली स्थगिती सरकारने तत्काळ उठवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनातून करण्यात आली. निवेदनानुसार महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून अडत मापाई, तोलाईच्या नावाखाली ३ ते १३ टक्क्यांपर्यंत अडत कमिशन घेऊन शेतकऱ्यांची लूट होत आहे. केंद्र सरकारने अनेक वर्षांपूर्वी कायदा करून शेतमालाची अडत किंवा इतर सर्व खर्च हा खरेदीदार व्यापाऱ्यांकडून घेण्यात यावा, असा कायदा केला. परंतु महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे, शेतकरी संघटनांच्या निष्क्रीयतेमुळे व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा कायदा अमलात येत नव्हता. राज्यशासनाचे पणन संचालक सुभाष माने यांनी शनिवारपासून याच कायद्याच्या आधारे महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अडतबंदी आदेश काढला. पण त्या आदेशाची अंमलबजावणी न करता राज्य सरकारने व्यापाऱ्यांची बाजू घेऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. भाजपचे फडणवीस ज्या गुजरातला आपला आदर्श मानतात त्या गुजरात आणि राजस्थान या भाजपशासित राज्यांमध्ये मागील १० वर्षांपासून याची अंमलबजावणी होत आहे. तेथील खरेदीदार, व्यापारी व अडते निमूटपणे या नियमाचे पालन करतात. मग महाराष्ट्रातच त्याच्या अंमलबजावणीसाठी नेमके अडत व व्यापाऱ्यांच्या पोटात का दुखते असा प्रश्न निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे. येथे संप व बाजार बंदचे फतवे व्यापारी वारंवार काढतात. सरकारही त्वरित याची दखल घेऊन कायदेशीर शेतकरी न्यायाच्या आदेशाला स्थगिती देते. त्यामुळे या कृतीचा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव निषेध व्यक्त करण्यात आला. अडतला कायमची बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डाहाके, सुधीर पांगूळ उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)