शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्याने ओतले जिल्हाकचेरीपुढे दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:35 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाची जोड द्यावी, असे पुढाऱ्यांसह समाजातील सर्वच नेत्यांकडून सांगितले जाते; परंतु, दूध संघाच्या चुकीच्या निकषामुळे शेतकरी तथा दुग्ध उत्पादक मेटाकुटीस आले आहे.

ठळक मुद्देसरसकट दूध खरेदी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाची जोड द्यावी, असे पुढाऱ्यांसह समाजातील सर्वच नेत्यांकडून सांगितले जाते; परंतु, दूध संघाच्या चुकीच्या निकषामुळे शेतकरी तथा दुग्ध उत्पादक मेटाकुटीस आले आहे. याच अटीमुळे त्रस्त झालेल्या अल्लीपूर येथील प्रितम वनधने नामक दूध उत्पादकाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.संतप्त शेतकरी प्रितम वरधने यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्याकडील दूध खरेदीसाठी संबंधितांकडून विविध कारणे पुढे करीत होत असलेल्या टाळाटाळाला कंटाळून जिल्हाकचेरीसमोर दूध ओतले. अल्लीपूर येथील गुरुदेव दूध उत्पादक सहकारी संस्थाच्यावतीने परिसरातील ८० दूध उत्पादकांकडून दूध गोळा करून शासकीय दुग्ध डेअरीत पाढविल्या जाते; पण याठिकाणी दूध असलेल्या १३ पैकी ६ कॅन ठेऊन बाकी कॅन प्रोटीन कमी असल्याचे सांगून परत करण्यात आले. त्याबाबत संबंधितांना तक्रार करूनही कुठलीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप यावेळी या आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने केला. दूध संघ चुकीचे निकष पुढे करीत शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. हा प्रकार नित्याचा झाला असून याचा नाहक त्रास दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी शेतकरी प्रितम वनधने यांनी केली. सदर संतप्त शेतकऱ्याने चक्क १३ कॅन दूध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

टॅग्स :milkदूध