शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाहीच; मास्क, सोशल डिस्टंन्सिंग हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

कोरोनाकाळात वर्धाकरांनी प्रशासनालाही उत्तम साथ दिल्याने जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. परंतु नंतरच्या काळात प्रशासनाकडूनही मोकळीक मिळाल्याने नागरिकांनी नियम धाब्यावर बसवत बेजबाबदारपणे वागणे सुरू केले. ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क, बाजारात अलोट गर्दी, सार्वजनिक कार्यक्रमाचा धडाका, विवाह सोहळ्यांचीही धामधूम, आदींमुळे कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला. 

ठळक मुद्देरोजगाराचा प्रश्न होणार गंभीर : नागरिकांची खबरदारीच ठरणार सर्वांच्या हिताची

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारोना काळातील शिथिलतेनंतरचा नागरिकांचा स्वैराचार आता चांगलाच अंगलट आला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा संचारबंदीचे नवे संकट उभे ठाकले आहे. आधीच कोरोनाच्या महामारीतून सावरले नसताना पुन्हा लॉकडाऊन सर्वांचा पोटमारा करणारे ठरणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन कुणालाही परवडणारे नसल्याने नागरिकांनी आता सजग होऊन मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हा मुख्य पर्याय ठरणार आहे.कोरोनाकाळात वर्धाकरांनी प्रशासनालाही उत्तम साथ दिल्याने जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. परंतु नंतरच्या काळात प्रशासनाकडूनही मोकळीक मिळाल्याने नागरिकांनी नियम धाब्यावर बसवत बेजबाबदारपणे वागणे सुरू केले. ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क, बाजारात अलोट गर्दी, सार्वजनिक कार्यक्रमाचा धडाका, विवाह सोहळ्यांचीही धामधूम, आदींमुळे कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने अ‍ॅक्शन मोडवर कामाला सुरुवात केली. ३६ तासांची संचारबंदी लागू करून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. विवाह सोहळ्यातही २० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याने पुन्हा तेच दिवस येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांसमोरही संकट उभे ठाकले आहे. आता दुसरा लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनीच काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे आता नागरिकांना पुन्हा लाॅकडाऊन हवा, की कामकाजात शिथिलता, याचा विचार नागरिकांनाच करावा लागणार आहेत.

धोका वाढतोय, सावधगिरी बाळगा शिथिलतेनंतर नागरिकांनी नियमांना फाटा दिल्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या आठवड्यात रुग्णसंख्या वाढताना दिसताच जिल्हा प्रशासनाकडून वर्धा, हिंगणघाट व देवळी या तीन तालुक्यांमध्ये कोरोनाचे २७ हॉटस्पॉट तयार केले असून संचारबंदी लागू केली आहे. सोबतच पुन्हा कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. नागरिकांनी आता लागलीच धोका ओळखून कोरोनावर मात करण्याकरिता सहकार्य करण्याची गरज आहे.

जिवापेक्षा नुकसान महत्त्वाचे नाही. आता या दुसऱ्या लाटेमध्ये घरच्या घरातच कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. बाजारातील गर्दी वाढायला लागली असून सांगूनही ग्राहक ऐकायला तयार नाहीत. शासकीय यंत्रणाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आणि व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान टाळण्यासाठीच उपाययोजना करीत आहे. पण, नागरिकांना त्याचे महत्त्व कळत नसल्याने लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. महामारी टाळण्यासाठी लॉकडाऊनची गरज असेल तो करायलाच पाहिजे. - शालिग्राम टिबडीवाल,   सदस्य, कापड व्यावसायिक संघटना 

उद्योग, व्यवसाय संघटनांचे प्रतिनिधी म्हणतातआधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लहान-मोठे उद्योग ऑक्सिजनवर आले आहेत. मालाला उठाव नाही. त्यातच कच्च्या मालाचे भावही गगनाला भिडले आहे. त्यामुळे उद्योगमालकांची चांगलीच अडचण होत आहे. अद्यापही शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याने मोठा फटका सहन करून रोजगाराकरिता उद्योग सुरू केले. आता पुन्हा लॉकडाऊन झाल्यास अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. शिवाय बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होईल. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन नकोच. - प्रवीण हिवरे,  अध्यक्ष,एमआयडीसी असोसिएशन, वर्धा 

आधीच्याच लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सेवा व्यावसायिकांना दीडशे ते दोनशे कोटींचा फटका सहन करावा लागला. ग्रामीण भागातील अनेकांनी आपले व्यवसाय बदलवून मोलमजुरीचा रस्ता धरला. त्या सावटातून सावरले नाही; आता पुन्हा लॉकडाऊन झाले तर परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षाही भयावह होईल. आत्ताच या नव्या आदेशाने जिल्हाभरात जवळपास १०० विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले. इतकेच नाही तर एप्रिल, मे व जून महिन्यांतील बुकिंगही थांबले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाले तर दुकानदारी विकावी लागेल.संजय ठाकरे,  सचिव, वर्धा सेवा समिती.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या