शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येनंतर ‘त्या’ शेतकऱ्याचे कुटुंब होते दोन दिवस उपाशी

By admin | Updated: October 9, 2015 02:35 IST

मक्त्याने शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या येथील गुणवंत नारायन झोटींग यांनी नापिकीमुळे गळफास लावून आत्महत्या केली.

बेदखल : शिधापत्रिका नसल्याने धान्य पुरवठाही नाहीगौरव देशमुख वायगाव (निपाणी)मक्त्याने शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या येथील गुणवंत नारायन झोटींग यांनी नापिकीमुळे गळफास लावून आत्महत्या केली. घरचा आधार गेल्याने हतबल झालेल्या त्यांच्या कुटुंबाच्या पोटात अन्नाचा एक दानाही गेला नाही. पत्नी व दोन मुलांनी सतत दोन दिवस वरणाच्या पाण्यावर दिवस काढल्याचे विदारक वास्तव पुढे आले. या कुटुंबाच्या घराकडे कोणीही जावून पाहिले नाही. प्रत्येक नागरिकाकडे शिधापत्रिका असावी, असा नियम आहे. मात्र वायगाव (निपाणी) येथील या कुटुंबाकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना धान्यही मिळू शकत नाही. यामुळे शासनाच्या योजनांपासूनही या कुटुंबाला वंचित राहण्याची वेळ आली आहे. या परिवाराला मदत करण्याची मागणी गावातून होत आहे. नावावर जमीन नसल्याने झोटींग यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळेल अथवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वायगाव (नि.) येथील गुणवंत झोटींग या ५० वर्षीय भूमिहीन कास्तकाराने ५ आॅक्टोबरला पहाटे ४ वाजता घरासमोरील कडू लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा पंचनामा करण्याकरिता पोलीस आले; मात्र त्यांच्या कुटुंबाला इतर कोणीही भेट दिली नाही. घरचा करता व्यक्ती जाताच या महिलेला आपल्या दोन मुलासह उपाशी दिवस काढावे लागले. कशीबशी रात्र दाळीचे पाणी पिऊन काढायची आणि दुसऱ्या दिवशी मुलांना घास भरविण्यासाठी काही तजविज होऊ शकते काय, या विवंचनेत ही माऊली सध्या आहे. हे भुकेचे तांडव सतत दोन दिवस त्या कुटुंबात नांदत होते. अठराविश्वे दारिद्रयावर मात करीत कुटूंब प्रमुख म्हणून आता अरुणा गुणवंत झोटींग हिने जबाबदारी स्वीकारली. तिच्या सोबत मुलगी पुनम व मुलगा अमर आहे. यातील पुनम व अमर यांचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. सपनाचे लग्न २०१२ मध्ये झाले तर पुनम ही बी.ए. ला आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अमर याने शिक्षण सोडून चहा टपरीवर काम सुरू केले आहे. या माऊलीवर आता दुसऱ्यांकडे पदर पसरवण्याची वेळ आली. जीवन झाले गहाणआत्महत्या केलेला गुणवंत झोटींग गत तीन वर्षांपासून आठ एकर कोरडवाहू शेती मक्त्याने करीत होता. सोयाबीन आणि कपाशी ही प्रमुख पिके घेत होता. जोड म्हणून मोठ्या शेतकऱ्याच्या शेतात सालकरी म्हणून कामही सुरू होते. अमर १५ वर्षांचा असून त्याने वडिलाला हातभार लावण्यासाठी चहा टपरीवर काम सुरू केले. यावर त्याच्या कुटूंबाचा गाढा होता. गत दोन वर्षांत कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे तोंडी आलेला घास हिरवला. आता सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. या वर्षीही वातावरणाने कहरच केला. अल्पप्रमाणात पाऊस व वातावरणात अचानक बदल होत जात असल्याने पिकावर आलेली रोगराई, अळ्यांचा हल्ला यामुळे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर पाहून गुणवंताची मनस्थिती खालावली. आणि त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला.