शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या आदेशानंतर घरकुलाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:08 IST

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी भागात लाभार्थ्यांची निवड स्वत: च्या मालकीची जागा व वार्षिक उत्पन्नाच्या निकषा आधारे केली जाते. परंतू शहरी भागात अतिक्रमीत व नझुलची जागा असल्याने ही योजना राबवितांना अनेक अडचणी येत असल्याने लाभांश कमी होतो.

ठळक मुद्देनगराध्यक्षांच्या प्रयत्नाला यश : अतिक्रमण नियमानुकूल होणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी भागात लाभार्थ्यांची निवड स्वत: च्या मालकीची जागा व वार्षिक उत्पन्नाच्या निकषा आधारे केली जाते. परंतू शहरी भागात अतिक्रमीत व नझुलची जागा असल्याने ही योजना राबवितांना अनेक अडचणी येत असल्याने लाभांश कमी होतो. त्यामुळे या नियमावलीत शिथिलता करण्याची मागणी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून शासनाने नागरी भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा आदेश पारीत केला आहे. यामुळे वर्ध्यातील जवळपास साडेचार हजार तर राज्यातील सहा लाख घरकुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यात ३८२ शहर व त्यालगतच्या नियोजन क्षेत्रात आवास योजना राबविली जात आहे. वर्धा शहरात ५ हजार लाभार्थ्यांनी पालिकेकडे अर्ज केले. नियमानुसार केवळ २५७ अर्जांना मंजुरी देण्यात आली. परंतू उर्वरीत ९२. ३२ टक्के प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी या योजनेच्या अंमलबजावणीकरिता नियमावलीत शिथिलता आणावी आणि नझुलच्या जागेत असलेल्या कुटूंबाना कायमस्वरुपी जागेचे मालकी हक्क द्यावा, अशी मागणी केली. यासंदर्भात राज्याचे वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन १३ नाव्हेंबरला अतिक्रमित जागेसंदर्भात परिपत्रक काढले. तसचे १७ नोव्हेंबर २०१८ रोजी शासनाने ‘सर्वासाठी घरे २०२२’या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा आदेश पारीत केला. त्यामुळे नगराध्यक्ष तराळे यांच्या प्रयत्नाने वर्ध्यासह राज्यातील ३८२ शहरातील घरकुलाचा प्रश्न सुटला आहे.नियमित करण्यासाठी समित्यांचे गठनमहानगरपालिका व ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत सदस्य म्हणून जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख तर सदस्य सचिव म्हणून महानगरपालिका आयुक्त अथवा उपआयुक्त व संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि ‘ब’ व ‘क’ वर्ग नगरपालिका व नगरपंचायत हद्दीकरिता उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेत सदस्य म्हणून उप-अधीक्षक भूमी अभिलेख व सदस्य सचिव म्हणून नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या समितीने आवश्यकतेनुसार सहायक संचालक व नगर रचनाकार यांच्या सल्ल्याने अतिक्रमण नियमित करतील.शासनाने काढलेला अतिक्रमण नियमानुकूल करणाऱ्या आदेशात जवळपास १६ अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार संबंधित समितीकडून ही कार्यवाही होणार आहे. या निर्णयामुळे वर्ध्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नझुल जागेत निर्वासीत कुटूंबाचा प्रश्न सुटेल व सर्व कुटूंबाना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येईल.अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा