शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर विद्यापीठाची चमू महाविद्यालयात

By admin | Updated: April 8, 2017 00:29 IST

येथील श्रीमती अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात दाखल विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्यावतीने

सुविधांचा मुद्दा : अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयातील प्रकार वर्धा : येथील श्रीमती अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात दाखल विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्यावतीने साध्या प्राथमिक सुविधांसह योग्य शैक्षणिक अर्हतेचा प्राचार्य नसल्याची तक्रार थेट डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे केली. याची दखल घेत विद्यापीठाची चमु शुक्रवारी महाविद्यालयात दाखल झाली. या चमुने विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचेही म्हणणे ऐकून घेत काही महत्त्वाच्या सूचना महाविद्यालयाला दिल्या. यावेळी चर्चेअंती योग्य शैक्षणिक अर्हता असलेला प्राचार्य नेमण्याच्या विशेष सूचना चमूने महाविद्यालयाला केल्या. या महाविद्यालयात बीएससी (कृषी) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे एकूण १८० विद्यार्थी आहे. महाविद्यालय सुरू झाले त्या काळापासूनच येथे सुविधांची बोंब आहे. शिवाय येथे शैक्षणिक वातावरणही नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे केली. याची दखल घेत विद्यापीठातील चमु शुक्रवारी महाविद्यालयात दाखल झाली. यावेळी विद्यार्थी व महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांत शाब्दिक चकमक उडाली. या सर्व तणावाच्या वातावरणात तब्बल दोन तास चर्चा झाली. या चर्चेअंती विद्यापीठाच्या चमुने महाविद्यालयाला प्राचार्याच्या नेमणुकीसह इतर बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. शिवाय विद्यापीठाच्या चमुने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत निर्णय घेतल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी) विद्यार्थ्यांची तक्रार मिळताच चौकशीकरिता महाविद्यालयात आलो. तक्रारीत असलेल्या मुद्यांवर विद्यार्थी, महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचारी व मॅनेजमेंटसोबत चर्चा केली. यात प्राचार्य नेमणुकीच्या सूचना महाविद्यालय व्यवस्थापनाला केल्या आहेत. त्यावर त्यांनी सहमतीही दर्शविली आहे. विद्यापीठाचा निरीक्षकाची नेमणूक महाविद्यालयावर लवकरच करण्यात येईल. - दामोधर तामगाडगे, निम्न शिक्षण प्रमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.