ऑनलाईन लोकमतवायगाव (नि.) : नजीकच्या सिरसगाव (ध.) येथे दहा वर्षांपासून बस सेवा बंद होती. बस फेऱ्या नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. सुमारे २ हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावातील विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत होता. यामुळे गावकºयांनी गावात बस देण्याची मागणी लावून धरली. याला यश आले असून अखेर रापमंच्या अधिकाºयांना गावात बस पाठवून जुनी फेरी पूर्ववत करावी लागली.गावात बससेवा नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा अवलंब करावा लागला आहे. बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन आॅटोने प्रवास करावा लागला. या भागात आॅटो उलटून अपघात झाल्याचे उदाहरण ताजे आहे. यात तीन ग्रामस्थ गंभीररित्या तर दोन ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले होते.यामुळे यशवंत विद्यालय वायगाव व सिरसगाव ग्रामपंचायतीने वारंवार बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. ही मागणी ‘लोकमत्स’ने लावून धरली. त्याची रापमंच्या अधिकाºयांनी दखल घेत कार्यवाहीला तातडीने प्रारंभ केला. तसेच ग्रामपंचायत सिरसगावचे उपसरपंच अमोल उघडे यांनी मासिक सभेत ठराव घेवून निवेदन दिले. यामुळे परिवहन महामंडळाने सिरसगाव-वायगाव-वर्धा या बससेवेला प्रारंभ केला. ही बस सिरसगाव येथे आल्यानंतर ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्यांनी बसची पूजा केली. बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी व ग्रामपंचायतीचे लोकमतचे आभार व्यक्त केले. तसेच बसचालक व वाहकाचा सत्कार केला.
१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिरसगावात आली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:25 IST
नजीकच्या सिरसगाव (ध.) येथे दहा वर्षांपासून बस सेवा बंद होती. बस फेऱ्या नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.
१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिरसगावात आली बस
ठळक मुद्देनागरिकांच्या मागणीला यश : विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा