शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:13 IST

शहरात अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यस्थापन केंद्र असावे या विचाराला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मुर्त रुप दिले असून यासाठी आयटीआय टेकडी परिसराची निवड केली आहे.

ठळक मुद्देशैलेश नवाल : आयटीआय टेकडीवर होणार साकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यस्थापन केंद्र असावे या विचाराला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मुर्त रुप दिले असून यासाठी आयटीआय टेकडी परिसराची निवड केली आहे.ज्या टेकडीकडे कुणीही नजरही टाकत नव्हते त्या टेकडीचा दिवसेदिवस विकास होत गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्या टेकडीची निवड केली आहे. तसेच स्वयंसेवी संस्थांना वृक्षारोपण, संवर्धन व सौदर्यीकरण करण्याची जबाबदारी सोपविली. याला जोड म्हणून साहसी मनोवृत्तीला प्रोत्साहन देण्याकरिता अडथळा पार प्रशिक्षणाचे बेसेस, रॉक क्लाईबिंग, रॅपेलिंग व पॅरासेलिंग सारख्या खेळाच्या सोयी निर्माण केल्या जात आहे. मुला-मुलींच्या व सुजान नागरिकांच्या साहसीवृत्तीस प्रोत्साहन द्यावे, म्हणून जिल्हाधिकारी नवाल यांनी अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली. त्यांनी सरकारी व स्वयंसेवी संस्थापुढे आवाहन केले असता वर्धेच्या प्रहार समाज जागृती संस्थेने ते स्विकारुन जिल्हाधिकारी यांच्या स्वप्नातील प्रशिक्षण केंद्र साकारण्याचे काम मागील दोन महिन्यापासून सुरु आहे. प्रहार संस्थेचे अध्यक्ष मोहन गुजरकर, सचिव संतोष तुरक, प्रा. रविंद्र गुजरकर यांच्या नेतृत्वात प्रहारचे स्वयंसेवक अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारीत आहे. या केंद्राचे उद्घाटन २२ नोव्हेंबरला होणार आहे. यानिमित्ताने बालकांसाठी एक दिवसीय तर तरुणांसाठी पाच दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर केंद्र महाराष्ट्रातील एकमेव केंद्र ठरणार असून येणाºया दिवसांमध्ये इच्छुकांना नागरी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे. टेकडीवर खड्डा करणे, अडथळा पार प्रशिक्षणाचे बेसेस उभारणे व साहस खेळासाठी कृत्रीम रॉक क्लाईबींग तयार करण्याचे काम अत्यंत कठीण असल्याने अनेकांनी नाकारले. पण प्रहार संस्थेने पुढाकार घेत कामालाही सुरुवात केली आहे.