शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना घेणार दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

खासदार महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दत्तक घेतले जाणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. खा. रामदास तडस पुढे म्हणले, खेळाडूंचे मनोधैर्य वाढावा या हेतूने समारोपीये कार्यक्रमासाठी ग्रेट खली यांना पाचारण करण्यात आले आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक खेळाडूला हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने खासदार क्रिडा महात्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (खं.) येथे धनुर्विद्या स्पर्धेच्या सुरुवातीने या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. तर समारोप देवळी येथे १ ते ३ एप्रिल या काळावधीत आयोजित विदर्भस्तरीय महिला व पुरुष कुस्तीगीर स्पर्धेने होणार आहे. खासदार महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दत्तक घेतले जाणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.खा. रामदास तडस पुढे म्हणले, खेळाडूंचे मनोधैर्य वाढावा या हेतूने समारोपीये कार्यक्रमासाठी ग्रेट खली यांना पाचारण करण्यात आले आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. खासदार क्रीडा महोत्सवात कबड्डी, कुस्ती, शंकरपट, क्रिकेट सामने, बास्केट बॉल स्पर्धा, व्हॉलिबॉल स्पर्धा, बॅट मिंटन, हॉकी आदी खेळाचे रंजक सामने होणार असल्याने हा महोत्सव एक प्रकारे खेळप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट,  प्रशांत बुर्ले,  मिलिंद भेंडे, गिरीश कांबळे, पवन परियाल, सुनील साकळे, नितीन जाधव, मनोज झाडे, सुनील तिवारी आदींची उपस्थिती होती.

कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार अकरा जिल्ह्यातील खेळाडू-    देवळी येथे आयोजित विदर्भस्तरीय महिला-पुरुष कुस्तीगीर स्पर्धेत वर्धा जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील अकरा जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. -    आपण  स्वत: विदर्भ  केसरी  असून या मातीतील  खेळाला  सध्याच्या विज्ञान आणि स्पर्धेच्या  युगात पुन्हा नव्या जोमाने  भरारी देण्याचे काम  या  स्पर्धेच्या  माध्यमातून केले जाणार असल्याचे यावेळी खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले.

तळेगाव (टालाटुले) येथे होणार शंकरपट : मिलिंद भेंडे-   शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला शंकरपट तळेगाव (टालाटुले) येथे १३ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. खासदार क्रीडा महोत्सवाचा एक भाग असलेल्या या शंकरपटात सुमारे २०० बैलजोड्या सहभागी होण्याची शक्यता आहे. या शंकरपटाच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट होणार असून हा शंकरपट शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे मिलिंद भेंडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस