शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची प्रवेश संख्या अनअपडेट

By admin | Updated: June 15, 2017 00:41 IST

केंद्रीय व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १५ हजार १३१ तर

शिक्षणातील मागासलेपण : पत्राला पाठ महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्रीय व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १५ हजार १३१ तर सीबीएसई बोर्डाचे अडीच ते तीन हजारांवर विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता १८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याकरिता कनिष्ठ महाविद्यालयात तेवढ्या तुकड्या आहेत काय, हा प्रश्नच आहे. सध्या याबाबत शिक्षण विभागही अनभिज्ञ असून २०१३ पासून तुकड्या व महाविद्यालयांची संख्या अपडेटच केली नसल्याचे समोर आले आहे. निकालानंतर चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक पालक, विद्यार्थी धावपळ करताना दिसतात; पण जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील (माध्यमिक) कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजूर तुकड्यांसह पटसंख्येची माहितीच २०१३-१४ पासून अपडेट करण्यात आलेली नाही. ही माहिती अपडेट व्हावी म्हणून ६ जूनच्या पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांकडून आवश्यक माहिती मागविण्यात आली होती; पण केवळ १० टक्केच कनिष्ठ महाविद्यालयांनी ही माहिती पाठविल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत जिल्ह्यातील १५ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य, कला, संयुक्त आदी विभागाचे शिक्षण पूढे घेणार आहे. आपल्या पाल्याला नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक पालक धडपड करताना दिसतो. आवश्यक कागदपत्रांची जुळवा-जुळवही ते करताना दिसतात; पण जि.प. शिक्षण विभागाकडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजूर तुकड्या व पटसंख्येची माहितीच अपडेट नाही. जिल्ह्यात सध्या विना अनुदानित ३४, स्वयं अर्थसहायीत १७, अनुदानित ८२ शाळा आहेत. तसेच विना अनुदानित १३ व अनुदानित १२ महाविद्यालये आहे. यात २० टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाची मान्यता घेणे क्रमप्राप्त आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व इतर विभागाच्या किती शाळा, प्रवेश क्षमता किती ही माहिती अद्ययावत व्हावी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र दिले; पण त्यांनीही पत्राला केराची टोपली दाखविली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा जि.प.चा शिक्षण विभाग किती मागासला आहे, हे समोर आले. तुकड्यांबाबत साशंकता मागील वर्षी १७ हजार ६६० विद्यार्थ्यांनी अकरावीमध्ये प्रवेश घेतले होते. यंदा या प्रवेश संख्येत घट झाली की वाढ, हे कळण्यास वाव नाही. अद्याप कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश संख्येची निश्चिती केली नाही. यामुळे २०१७-१८ सत्रातील १८ हजारांवर विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवेश मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. महाविद्यालयांना केलेल्या प्रवेशबंदीचा अकरावी प्रवेशावर परिणाम नसला तरी अनिश्चितता आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजूर तुकड्या तसेच पटसंख्येची माहिती अपडेट व्हावी म्हणून जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात नमूद केलेली माहिती त्वरित पाठविणे क्रमप्राप्त असताना अद्याप बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती पाठविलेली नाही. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात येईल. - एस.आर. मेश्राम, उपशिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. वर्धा.