शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय इमारतीत पार्र्कींगचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:15 IST

स्थानिक सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत विविध शासकीय कार्यालये आहेत. येथे नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना देणाºया उप प्रादेशिक परिवहन कार्यालय असून शासनाच्या ज्या यंत्रणेकडून नियमांवर बोट ठेऊन

ठळक मुद्देप्रशासकीय व्यवस्थेचा दिव्याखाली अंधार : बेशिस्तपणे वाहने केली जातात उभी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत विविध शासकीय कार्यालये आहेत. येथे नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना देणाºया उप प्रादेशिक परिवहन कार्यालय असून शासनाच्या ज्या यंत्रणेकडून नियमांवर बोट ठेऊन वाहन चालविण्याच्या परवाना दिल्या जातो, त्याच यंत्रणेच्या कार्यालयापुढे सध्या बेशिस्तपणे वाहने उभी केल्या जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.प्रशासकीय इमारत परिसरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कामगार न्यायालय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, जिल्हा भुमिअभिलेख कार्यालय आदी कार्यालये आहेत. तेथे विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी या इमारतीच्या मागील बाजूला वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, सध्या अनेक वाहनचालक व या इमारती मधील विविध कार्यालयात कार्यरत कर्मचारी आपली वाहने इमारत परिसरात असलेल्या वाहनतळावर उभी न करता चक्क इमारत परिसरात मनमर्जीने उभी करीत आहेत. बेशिस्तपणे वाहने उभी केल्या जात असल्याच्या प्रकाराकडे संबंधीतांचे दुर्लक्ष होत असल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाºया वाहनांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच मनमर्जीने उभी केल्या जाणाºया वाहनांमुळे बहुतांश वेळी येथे वाहतुकीचा खोळंबा होतो. इतकेच नव्हे तर साधे पायी ये-जा करणाºयांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार वाहतुकीच्या नियमांवर बोट ठेऊन नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना देणाºया उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी उघड्या डोळ्यांनी प्रत्येक दिवशी बघत असले तरी बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कुठलेही पाऊल उचलल्या जात नसल्याची चर्चा या परिसरात आहे. विविध कामानिमित्त जिल्ह्यातील गावांमधून व जिल्ह्याबाहेरून येणाºया नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता त्वरित योग्य पाऊल उचलत बेशिस्तांना शिस्त लावण्याची गरज आहे.एटीएममधून पैसे काढणाºयांना सहन करावा लागतो त्रासप्रशासकीय इमारत कार्यालय परिसरातील विविधा केंद्राच्या इमारतीत नागरिकांना सुविधा व्हावी या उद्देशाने एका राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम देण्यात आले आहे. याचा वापर येथे जिल्ह्यातील गावागावांमधून येणाºयांसह विविध शासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी करतात. परंतु, एटीएमकडे जाणाºया रस्त्यावर सध्या मनमर्जीने वाहने उभी केली जात असल्याने एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाणाºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विविधा केंद्राच्या परिसरात बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. मनमर्जीनेच या भागात वाहने उभी केल्या जात असल्याने वाहतूक खोळंबते.शासकीय कार्यालयाच्या खिडक्याही तुटलेल्याचसिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत सुमारे २० शासकीय कार्यालये आहेत. सध्या या इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू असून इमारतीमधील अनेक विविध शासकीय कार्यालयाच्या खिडक्या तुटलेल्या आहेत.खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असल्याने अनेक शासकीय कार्यालयात पावसाचे पाणी गळत असून शासकीय दस्ताऐवजाचे नुकसान होत असल्याची चर्चा या इमारतीमधील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत कर्मचाºयांमध्ये आहे.