शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशवारी करून परतलेल्या सहा व्यक्तींवर प्रशासनाचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST

ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात विदेशवारी करून परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत सहा व्यक्ती विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतले असून त्यापैकी तीन व्यक्ती मुंबई, दोन हैदराबाद तर एक दिल्ली येथील विमानतळावर उतरल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आलेत. असे असले तरी या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात सहा व्यक्ती परतले आहेत. या सहा व्यक्तींमध्ये तीन पुरुष तर तीन महिलांचा समावेश असून या सहाही व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी केली असता त्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या सहाही व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शिवाय त्यांची वेळोवेळी कोविड टेस्ट केली जाणार असून कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. एकूणच विदेशवारी करून जिल्ह्यात परतलेल्या या व्यक्तींवर जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा बारकाईने लक्ष आहे. मुंबई, हैदराबाद अन् दिल्ली होत परतले वर्ध्यात-    ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात विदेशवारी करून परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत सहा व्यक्ती विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतले असून त्यापैकी तीन व्यक्ती मुंबई, दोन हैदराबाद तर एक दिल्ली येथील विमानतळावर उतरल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आलेत. असे असले तरी या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे.-    या व्यक्तींवर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष असून त्यांची विलगीकरण कालावधीत वेळोवेळी कोविड चाचणी केली जाणार आहे. जर कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पॉझिटिव्ह व्यक्तीचे स्वॅब ओमायकॉनची शहानिशा करण्यासाठी पुणे येथे पाठविले जाणार आहे.

विदेशवारी करून आलेल्यांत वर्धेतील सर्वाधिक -   विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्यांमध्ये वर्धा शहरातील चार, हिंगणघाट येथील एक तर वर्धा शहराशेजारील नालवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

दोघांनीच घेतली आहे कोविडची व्हॅक्सिन-    विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या सहा व्यक्तींमध्ये तीन महिला तर तीन पुरुषांचा समावेश आहे. या सहापैकी केवळ दोन व्यक्तींचीच कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.

पाचव्या आणि दहाव्या दिवशी होणार पुन्हा कोविड चाचणी-    विदेशवारी करून परतलेल्यांची विलगीकरण कालावधीत पाचव्या दिवशी तसेच दहाव्या दिवशी आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून शासनाच्या सूचनांचे पालन करून घेतले जाणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन