शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या दिवशीही प्रशासन स्तब्धच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:04 IST

थकित वेतनाच्या मागणीसाठी दि वर्धा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. वर्धा अंतर्गत येणाऱ्या गटसचिवांनी गुरूवार ७ जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर बुधवारी आंदोलनाच्या सातव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन सुरूच होते.

ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांचा आरोप : गटसचिवांचे बेमुदत उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थकित वेतनाच्या मागणीसाठी दि वर्धा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. वर्धा अंतर्गत येणाऱ्या गटसचिवांनी गुरूवार ७ जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर बुधवारी आंदोलनाच्या सातव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन सुरूच होते. सात दिवस लोटूनही ढिम्म जिल्हा प्रशासन मागण्यांवर तोडगा काढण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.दि वर्धा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. वर्धा अंतर्गत काम करणारे ७९ गटसचिव तसेच चार कर्मचाºयांना गत तीन वर्षांपासून वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७९ (१) अन्वये कलम ६९ (ख) नुसार जिल्हा देखरेख मार्फत नियुक्त केलेल्या गटसचिवांचे वेतनापोटी द्यावयाची १.२५ पट रक्कम जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या खात्यात किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात दरमहा १० तारखेपर्यंत जमा करावी. ज्या संस्था वेतनाची रक्कम या पद्धतीने जमा करणार नाही. त्यांच्याबाबत जिल्हा बँकेने जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीनुसार संबंधित संस्थेच्या बँक खात्याला रक्कम नावे टाकून जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या खात्यात जमा करावी, अशा सुचना असताना त्याकडे दुर्लक्ष करीत गटसचिवांचे वेतन अडविण्यात आले. हे धोरण चुकीचे असून गटसचिवांना तात्काळ त्यांना वेतन देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाच्या सातव्या दिवशी जिल्हाकचेरीसमोर धरणे देत रेटून लावली. आंदोलनात मोठ्या संख्येने गटसचिव सहभागी झाले होते. माजी आमदार राजू तिमांडे यांनी आज उपोषण मंडपाला भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.महिला काँग्रेसने जाहीर केला पाठींबावर्धा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. वर्धा अंतर्गत कार्यरत गटसचिवांना त्यांचे तीन वर्षांचे थकित मिळालेच पाहिजे. त्यांनी ज्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे त्या मागण्या रास्त आहेत. या आंदोलनाला महिला काँग्रेस पाठींबा जाहीर करीत असून संबंधितांनी मागण्यांच्या सोडवणुकीसाठी तात्काळ योग्य पावले उचलावित, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर पाठींब्याबाबतचे पत्र त्यांनी त्यांच्या खासगी सचिवांमार्फत आंदोलनकर्त्यांना सादर केले आहे. सदर पत्र काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांनी एच.सी. बुचे, जी.बी. महाजन, ए.जी. बोरकर, जी.एम. डहाके, डी. वाय. घोडमारे, पी.एम. काळे यांच्या स्वाधीन केले.