शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आदिवासी विद्यार्थ्यांना सत्राअंतीही शिष्यवृत्तीची प्रतीक्षाच

By admin | Updated: April 12, 2017 00:24 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेची सन २०१५-१६ ची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाही.

माहितीचा अधिकार : शासन-प्रशासन सुस्त असल्याचा प्रत्ययवर्धा : आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेची सन २०१५-१६ ची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाही. गत शैक्षणिक सत्राकरिता जिल्ह्यातील १६,८७६ विद्यार्थ्यांकरिता २ कोटी ५९ लाख ७ हजार ५०० रुपये निधी शिक्षण विभागाकडे आला असताना त्याचे वितरण झाले नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. ही माहिती जिल्हा क्षेत्रीय प्रचार कार्यालय, सूचना आणि प्रसार मंत्रालय, भारत सरकार, आसाम आणि अरूणाचल प्रदेश टूर पार्टीचे वर्धा व यवतमाळ येथील माजी मतप्रतिनिधी मारोती उईके व प्रजासत्ताक शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरूणकुमार हर्षबोधी यांनी माहिती अधिकारात समोर आणली. यातून निघालेल्या माहितीनुसार विद्यार्थी निधी असतानाही शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे दिसून आले आहे. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेमध्ये सन २०१५-१६ साठी एकूण विद्यार्थी संख्या १६ हजार ८७६ एवढी आहे. या योजनेचा एकूण निधी २ कोटी ५९ लाख ७ हजार ५०० रुपये एवढा आहे; मात्र हा निधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे गत ११ महिन्यांपासून पडून होता. मारोती उईके यांनी अधिक माहिती घेण्यासाठी आदिवासी विभाग, आयुक्त कार्यालय, नागपूर यांच्याकडे धाव घेतली. यावेळी केलेल्या चौकशीत सदर कार्यालयाने जि.प.वर्धाकडे शिष्यवृत्तीची रक्कम पूर्वीच पाठविली होती; परंतु विद्यार्थ्यांची यादी मात्र पाठविली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारणा केली असता विस्तार शिक्षणाधिकारी यांच्याकडून यादी मिळत नसल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही, असे टाळाटाळीचे उत्तर दिले. विशेष म्हणजे सदर कार्यालयाचे उपकार्यालय वर्धा येथे कार्यरत आहे. येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी कार्यालयात आले नसल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली.शिष्यवृत्तीची रक्कम जिल्हा परिषदेकडे पडूनवर्धा : सत्र २०१६-१७ ची शिष्यवृत्ती ही जि.प. वर्धाकडे पडलेली आहे. सदर बाब ही गंभीर असून दोषी कर्मचारी व अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना संघटनेच्यावतीने मारोती उईके यांनी केली. आदिवासी आश्रम शाळा व वसतीगृह हेतुपुरस्पर बंद पाडण्याचे षडयंत्र असून आदिवासींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. आदिवासींना त्यांच्या हक्क व अधिकारापासून जर शासन, प्रशासन दूर ठेवत असेल तर संपूर्ण जिल्ह्यात प्रजासत्ताक तर्फे तीव्र आंदोलन केल्या जाईल, अशी माहिती पत्रकाद्वारे मारोती उईके व हर्षबोधी यांनी दिली.(प्रतिनिधी)४ हजार ३८४ विद्यार्थी शिष्यृवत्तीपासून वंचित ३० जानेवारीपासून आजपर्यंत प्रजासत्ताक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मारोती उईके यांनी सदर घटनेचा पाठपुरावा केला असता आतापर्यंत एकूण रक्कमेच्या १ कोटी १९ लाख ६१ हजार पाचशे रुपये एवढी शिष्यवृत्ती १० हजार ५३५ विद्यार्थ्यांना मिळाली, पैकी अधिकाऱ्यांच्या रटाळ कामामुळे २१९ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ३ लाख ३६ हजार ५०० हे परत गेलेले आहे. एकूण १ हजार ९५७ विद्यार्थ्यांची एकूण रक्कम २८ लाख ८५ हजार ५०० रुपये हे जि.प. कडून वित्त विभागाला सादर करण्यात आली आहे. यामुळे आजही ४ हजार ३८४ विद्यार्थी वंचितच राहिले आहे.