शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

५३ कोटींची अतिरिक्त मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:26 IST

जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०१९- २० साठी प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी आणि आलेल्या प्रस्तावाची   छाननी करण्यासाठी लघुगटाची बैठक गुरूवारी पार पडली. सन २०१९- २० साठी सर्वसाधारण योजनेमध्ये शासनाने दिलेल्या १०७ कोटी ५७ लक्षाच्या नियमित नियतव्ययामध्ये ५३ कोटींची अतिरिक्त मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देलघुगटाची बैठक : जिल्हा वार्षिक योजना २०१९- २० चे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०१९- २० साठी प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी आणि आलेल्या प्रस्तावाची   छाननी करण्यासाठी लघुगटाची बैठक गुरूवारी पार पडली. सन २०१९- २० साठी सर्वसाधारण योजनेमध्ये शासनाने दिलेल्या १०७ कोटी ५७ लक्षाच्या नियमित नियतव्ययामध्ये ५३ कोटींची अतिरिक्त मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.नवीन उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला आमदार समीर कुणावार,जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, प्रभारी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता राऊत, प्रतिभा बुर्ले उपस्थित होत्या. जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० साठी सर्वसाधारण  योजनेसाठी शासनाने १०७ कोटी ५७ लक्ष रुपयांची आर्थिक मर्यादा घालून दिली आहे. यामध्ये गाभा क्षेत्रासाठी ७१ कोटी ७१ लक्ष  तर बिगर गाभा क्षेत्रासाठी ३५ कोटी ८५ लक्ष रुपये ठेवण्यात आले आहेत. मात्र जिल्ह्यात   ग्रामपंचायत जनसुविधा, यात्रा स्थळविकास, पूर नियंत्रण, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा दुरुस्ती, व्यायामशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रबांधकाम, नागरी भागातील दलित वस्ती सुधारणा, ग्रामीण पाणी पुरवठा, पाणी पुरवठा योजना गावठाण फिडरवर आणणे, तसेच आदिवासी आणि मोठ्या गावातील पाणी पुरवठा योजना सोलरवर घेणे, आणि शासकीय कार्यालयाचे बांधकाम व दुरुस्ती  ही कामे प्राथमिकतेने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी अतिरिक्त ५३ कोटी रुपयांचा  निधीची मागणी करण्यात यावी असे आमदार कुणावार यांनी सांगितले.ग्रामीण भागात रोहित्र नादुरुस्त झाल्यास १५ दिवस त्या गावातील वीज पुरवठा बंद होतो. यासाठी ५० नवीन रोहित्र जिल्हा वार्षिक योजनेमधून खरेदी करण्याचा प्रस्ताव यामध्ये ठेवावा असेही त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजना गावठाण फिडरवर बदली कराव्यात यासाठी १ कोटी रुपयांचा निधी ठेवण्यासही त्यांनी सांगितले. लघुगट बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास कुणावार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी चारा टंचाई लक्षात घेता चारा लागवड करण्यासाठी पुनर्विनियोजन मध्ये निधीची मागणी करावी अशी सूचना पशुसंवर्धन विभागाला दिल्यात. तसेच जिल्हा परिषदच्या ज्या अंमलबजावणी विभागाकडे मागील वर्षीचा निधी अखर्चित असेल त्यांनी आधी तो खर्च करावा. तसेच सन २०१८-१९ चा निधी वेळेत खर्च करण्यासाठी तात्काळ प्रशासकीय मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्यामुळे त्या कालावधीत कोणत्याही प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देता येणार नाही असेही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच अनुसूचित जाती उपयोजना यामध्ये ४० लक्ष ४८ कोटी आणि आदिवासी उपयोजना १६ कोटी ७८ लक्ष रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. या बैठकीला अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते. आमदार कुणावार यांनी मागील वर्षी खर्च झालेल्या निधीचा आढावा घेतला.