शशिकांत शिंदे : राकाँचा मेळावा पुलगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेस शेतकऱ्यांचा चेहरा होता. आजही शेतकऱ्यांना पक्षाविषयी जिव्हाळा आहे. त्यांचे प्रश्न हाच पक्ष निकाली काढू शकतो, हा विश्वास त्यांना आहे. आपल्या दुर्लक्षामुळे जनतेत काहीसा नाराजीचा सूर आहे; पण आता पक्ष जनतेच्या पाठीशी आहे, असा विश्वास निर्माण करायचा आहे. शेतकरी, कामगार व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून शेतकऱ्यांच्या समस्यांशी आपली नाळ जोडा, असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसचे आ. शशिकांत शिंदे यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे येथील मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला आ. ख्वाजा बेग, माजी आमदार राजू तिमांडे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, समीर देशमुख यांच्यासह जि.प. सदस्य संजय कामनापुरे, संदीप किटे, संजय काकडे, शहर अध्यक्ष श्यामसुंदर देशमुख, विश्वास येंडे, राजू बोबडे, रा.काँ. महिला अध्यक्ष शैला राऊत, रायुकाँ अध्यक्ष विजय धोपटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कामनापुरे यांनी तर संचालन प्रविण ढांगे यांनी केले. याप्रसंगी पत्रपरिषदेत जयभारत टेक्सटाईल्सच्या कामगारांना किमान वेतन कायदा लागू करावा. बीईसी फर्टिलाईझरचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करू, असेही शिंदे यांनी सांगितले. देशमुख यांनी समस्यांचा उहापोह केला. यावेळी विजय राऊत, महादेव भोयर, बाबाराव बिरे, विजय भटकर, सुभाष ढोले, प्रशांत राऊत आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या समस्यांशी आपली नाळ जोडा
By admin | Updated: August 12, 2016 01:47 IST