शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांना अटक व सुटका

By admin | Updated: May 30, 2014 00:17 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या रकमा परत करण्याच्या मागणीला घेऊन बुधवारी ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. हे आंदोलन मोडीत काढत

पोलीस कारवाईनंतर आंदोलन मागे : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ठेवीदारांचाही समावेशवर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या रकमा परत करण्याच्या मागणीला घेऊन बुधवारी ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. हे आंदोलन मोडीत काढत गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या आंदोलनकर्त्यांना शहर पोलिसांनी अटक करून सुटका केली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान किसान अभियानचे मुख्यप्रेरक अविनाश काकडे व जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्त्वातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांची भेट घेतली. यावेळी निवेदन सादर करीत जोपर्यंत शासनाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला. यानुसार सदर आंदोलन सुरू करण्यात आले होते.वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या मार्फत आर्थिक मदत देवून जिल्हा बँकेचे महाराष्ट्र सहकारी बँकेत विलीनीकरण करा व एक लाखावरील रकमेच्या थकबाकीदार कर्जदारांची सक्तीने वसुली करण्याचे आदेश जिल्हा बँकेतील प्रशासनाला देवून अडचणीत सापडलेल्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली होती. या आंदोलनात किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहे. या सर्व शेतकर्‍यांना गुरुवारी शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना शहर ठाण्यात नेण्यात आले. येथे स्थानबद्ध करून सोडण्यात आले. बँकेत रक्कम असलेल्या शेतकर्‍यांनी व खातेदारांनी किसान अधिकार अभियानच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)