शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाची अवैध आरामशीनवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:14 IST

बजाज चौकातील उड्डाण पुलाखाली सुरू असलेल्या अवैध आरामशीनवर वनविभागाच्या अधिकाºयांनी धाड घातली.

ठळक मुद्देलाकूड व मशीन जप्त : एकाला घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बजाज चौकातील उड्डाण पुलाखाली सुरू असलेल्या अवैध आरामशीनवर वनविभागाच्या अधिकाºयांनी धाड घातली. या व्यावसायीकाकडे लाकूड कटाईचा कुठलाही परवाना नसल्याने मशीन जप्त करून मशीन मालक भरतकुमार मनसुखलाल पटेलीया याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.या कारवाईत आरामशीनवर असलेले लाकूड चोरीचे असल्याचे या कारवाईत समोर आले. यावेळी भरतकुमार पटेलीया याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे १० हजार रुपयांचे लाकूड व मशीन तसेच इतर साहित्य असा एकूण २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक वनसंरक्षक एस. जी. बढेकर, वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. बन्सोड, यु. व्ही. सिरकुडकर, आर. व्ही. राऊत, बी.डब्ल्यु इंगळे, ए.के. कांडलकर, शेख व पोलीस कर्मचारी सुनील चोपडे, विशाल देवतळे यांनी केली. वृत्त लिहीस्तोवर जप्तीची कारवाई सुरू होती.कटाई करून लाकडाची फर्निचरसाठी विक्रीवनविभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या कारवाईत भरतकुमार पटेलिया याच्याकडून मोठ्या प्रमाणात लाकूड जप्त केले. भरतकुमार पटेलिया याच्याकडे पूर्वी आरामशीनचा परवाना होता. परंतु, तो त्याने काही वर्षांपूर्वी वर्धेतीलच एका व्यावसायिकाला विकल्याची माहिती समोर आली. पटेलीयाकडून लाकुड कटाई करून त्याची फर्निचर तयार करणाºयांना विक्री केली जात असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात लाकूड जप्त करण्यात आले.