शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरवर अन्न व औषधी विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:01 IST

महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट अंतर्गत कोणतीही परवानगी तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कोणताही परवाना नसताना अ‍ॅलोपॅथिक औषधाचे वितरण करीत असलेल्या देवळी तालुक्यातील अंदोरी...

ठळक मुद्देदेवळी येथील डॉक्टर : मुदतबाह्य अ‍ॅलोपॅथी औषधी, फिजीशयन सॅम्पल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट अंतर्गत कोणतीही परवानगी तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कोणताही परवाना नसताना अ‍ॅलोपॅथिक औषधाचे वितरण करीत असलेल्या देवळी तालुक्यातील अंदोरी येथील बोगस डॉक्टरवर अन्न व औषधी विभागाने कारवाई केली. या डॉक्टरचे नाव विलास लक्ष्मन नांदे असे आहे.अन्न व औषध प्रशासनाने मिळालेल्या माहितीनुसार औषध निरीक्षक तथा सहाय्यक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार), शहनाज खलील ताजी यांच्या मार्गदर्शनात डॉ. विलास नांदे चालवित असलेल्या अंदोरी स्थित स्वागत क्लिनीकची तपासणी केली. तपासणीच्यावेळी या डॉक्टराच्या क्लिनीकमध्ये बराचसा मुदतबाह्य अ‍ॅलोपॅथिक औषधीचासाठा तसेच वैद्यकीय सामुग्री मिळून आली. डॉ. नांदेकडे अ‍ॅलोपॅथिक औषधांचे वितरणाकरिता महाराष्ट्र मेडिकल प्रॉक्टीशनर अ‍ॅक्ट अंतर्गत परवानगी तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कोणताही परवाना उपलब्ध नसून फक्त डिप्लोमा इन इलेक्ट्रोहोमियोपॅथी मॅडिसीनचे प्रमाणपत्र आढळले. यावरुन डॉ. नांदे अवैधरितीने अ‍ॅलोपॅथीक वैद्यकीय व्यवसाय करून व मुदतबाह्य औषधीचे वितरण रुग्णांना करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे आढळले. ते जनहिताच्या व रुग्णांच्या आरोग्यास हानिकारक असल्याचे दिसून आले. तपासणीच्या वेळी आढळलेला संपूर्ण अ‍ॅलोपॅथीक औषधीचा सुमारे ७२ हजार ९६७ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सदर बोगस डॉक्टरांकडे जप्त केलेल्या औषधीसाठ्याचे खरेदी बिल उपलब्ध नव्हते. या प्रकरणी देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.सदर कारवाई मोहन केकतपुरे, सहआयुक्त(औषधे) नागपूर व पी.एम. बल्लाळ, सहाय्यक आयुक्त (औषधे) नागपूर यांच्या मार्गदर्शनात केली.घरीही आढळला औषधीसाठाक्लिनीकला लागून असलेल्या डॉ. नांदेच्या घराची तपासणी केली असता येथे मुदतबाह्य अ‍ॅलोपॅथिक औषधी, फिजीशियन सॅम्पल, सलाईनच्या बॉटल्स, सिरप, एन्टीबायोटिक टेबलेट, केप्सुल, आयव्ही सेटस व इतर औषधांचा साठा अवैधरित्या साठविलेला असल्याचे दिसून आले.औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ चे नियम ६५ अंतर्गत किरकोळ औषधी विक्रेत्यांना अ‍ॅलोपॅथीक औषधांची विक्री मान्यता प्राप्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या प्रिस्क्रीप्शनवरुन रुग्णाना व घाऊक विक्रेत्यांना लिखीत मागणी पत्रावरून क्लिनीकला पुरवठा करणे बंधनकारक आहे. सदर प्रकरणी तपासाअंती आढळलेल्या सर्व पुरवठादार व इतर संबंधित विक्रत्यांविरुद्ध तसेच कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाºया पुरवठादारांविरुद्ध सदर कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल.- शहनाज खलील ताजी, सहाय्यक आयुक्त(औषधे), अन्न व औषध प्रशासन, वर्धा