शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर मालकावर कारवाई अन् आर्थिक मदतीची याचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:00 IST

घरातील कर्त्या मुलांचा अपघातात बळी गेल्याने त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड, परिवाराचा खर्च आणि मुलाबाळांचे शिक्षण कसे करावे? असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केले. कमी परिश्रमात आणि कमी दिवसात जास्त पैसा कमाविण्याच्या नादात येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांनी वाळूचोरीचा गोरखधंदा सुरु केला आहे. यातच त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन अनिल लाकडे व ऋतिक वानखेडे या दोघांचा जीव गेल्याने त्यांचे परिवार उघड्यावर आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी :  तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे वाळू चोरीकरिता जात असलेल्या एम.एच.३२ ए.एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन दोन मजुरांचा बळी गेला तर पाच जखमी झाले आहे. त्यामुळे मृतकाच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी त्यांचे घर गाठले. तेव्हा परिवाराच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले.  ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करा आणि उघड्यावर आलेला संसार सावरण्याकरिता आर्थिक मदत मिळवून द्या, अशी मागणी लावून धरली.घरातील कर्त्या मुलांचा अपघातात बळी गेल्याने त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड, परिवाराचा खर्च आणि मुलाबाळांचे शिक्षण कसे करावे? असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केले. कमी परिश्रमात आणि कमी दिवसात जास्त पैसा कमाविण्याच्या नादात येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांनी वाळूचोरीचा गोरखधंदा सुरु केला आहे. यातच त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन अनिल लाकडे व ऋतिक वानखेडे या दोघांचा जीव गेल्याने त्यांचे परिवार उघड्यावर आले आहे. खासदार रामदास तडस यांनी मृतकांच्या परिवाराचे सांत्वन करून प्रत्येकी दहा हजार व जखमी मजुरांपैकी एकाला पाच हजारांची मदत केली. तसेच कायम तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासनही दिले.  खासदार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले असता नागरिकांनी त्यांना गराडा घालून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. या प्रकरणी न्याय देण्याची मागणी केली.

गंभीर जखमीला एका दिवसातच सुटी-    या अपघातात गंभीर जखमी झालेले शिवराज दादाराव डोंगरे व इतर एकाला सेवाग्राम रुग्णालयातून एकाच दिवशी सुटी दिल्यामुळे कुटुंबियांनी रोष व्यक्त केला. डोंगरे यांचा एक पाय ्रफॅक्चर तसेच दुसऱ्या पायाला व डोक्याला गंभीर जखमा असताना त्यांना रुग्णालय प्रशासनाने घरी पाठविले. या रुग्णाची स्थिती गंभीर असल्याची बाब खा. तडस यांच्या भेटीदरम्यान समोर आली. यासाठी खा. तडस यांनी रुग्णालय प्रशासनाला दोषी ठरवून जाब विचारला. तसेच या रुग्णाची रुग्णवाहिकेमधून पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवानगी करण्यात आली.

 

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसAccidentअपघात