शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवरील कारवाई थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:15 IST

 लाेकमत न्यूज नेटवर्क वर्धा :   राज्यात पाऊस वेळेवर आल्याने खरीपाच्या लागवडीची लगबग सुरु झाली. सुरुवातीलाच सोयाबीनचे बियाणे बोगस ...

ठळक मुद्देराज्यभरात ३० हजार तक्रारी बियाण्यांवरील खर्च व्यर्थ, शेतकऱ्यांचे वर्षभराचे उत्पन्नही गेले

 लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा :   राज्यात पाऊस वेळेवर आल्याने खरीपाच्या लागवडीची लगबग सुरु झाली. सुरुवातीलाच सोयाबीनचे बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सुरु झाल्यात. यामध्ये कपाशीचाही समावेश असून राज्यभरात बोगस बियाण्यांसंदर्भात तब्बल ३० हजार तक्रारी शासनाला प्राप्त झाल्यात. एकट्या वर्धा जिल्ह्यातच ३२९ तक्रारी असून काही प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले पण, पुढील कारवाई थंडबस्त्यात असल्याने शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाहीत.राज्यभरात यावर्षी सततचा पाऊस, बोगस बियाणे आणि रोगाचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरलेले कपाशी व सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. बियाण्यांची उगवण क्षमताच कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी ३० हजार तक्रारी शासनाला प्राप्त झाल्याचे खुद्द कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये महाबीजसह बावीस कंपन्यांंचा समावेश असल्याचेही निदर्शनास आले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून कारवाईला गती देत काही ठिकाणी कंपनी व कृषी केंद्रांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. पण, त्यानंतर पुढे कारवाईला थांबा देण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा बियाण्यावरील खर्च व्यर्थ गेला असून वर्षभराचे उत्पन्नही गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यभरातील शेतकरी कार्यालयाचे उंबरठे झिजवित असून कागद काळे करुन थकले पण, अद्याप मोबदला मिळाला नाही.

 जिल्ह्यात सोयाबीनच्या ५३० तक्रारी खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत ५३० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३२९ तक्रारीमध्ये बियाण्यात दोष आढळून आल्याने इंदोरच्या एका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ११७ शेतकऱ्यांना १८९ बॅग सोयाबीन बियाणे वितरण करून  ४ लक्ष ८५ हजार ७५०  रुपये नुकसान भरपाई दिल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. खरीप हंगामामध्ये बियाणे ४५२, रासायनिक खते ३१५ व कीटकनाशक २६५ कृषी केद्रांची तपासणी केली असता बियाणे ४७, रासायनिक खते १७ व किटकनाशक ६  अशा एकूण ७० कृषी केंद्रांना विक्रीबंदचे आदेश देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मी ६२ एकरामध्ये सोयाबीनची पेरणी करण्याकरिता ६५ बॅग सोयाबीनची खरेदी केली होती. पेरणीपर्यंत सात लाख रुपयांच्यावर खर्च आला. पण, पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतात वखरणी करावी लागली. कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर कंपनी आणि कृषी केंद्र संचालकावर गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यावर तोडगा निघाला नाही तर दिवाळीनंतर आम्ही सर्व नुकसानग्रस्त शेतकरी आंदोलन करणार आहे.- शीतल चौधरी, शेतकरी, गोविंदपूर ता.हिंगणघाट

टॅग्स :agricultureशेती