शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २९७ वाहन धारकांवर कारवाई

By admin | Updated: June 25, 2017 00:43 IST

वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. पोलीस निरीक्षक बदलताच या कारवाईला वेग आल्याचे दिसून आले. गुरूवारी डॉ. आंबेडकर व बजाज चौकात तथा शुक्रवारी शहरात अन्यत्र मोहीम राबविण्यात आली. २९७ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. गुरूवारी चुकीच्या दिशेने वाहने चालविणाऱ्या १४८ तर नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करणाऱ्या ५५ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी एकूण ९४ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलीस शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई येथील दत्तात्रय गुरव यांनी सूत्रे स्वीकारली. कार्यभार स्वीकारताच त्यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गुरूवारी डॉ. आंबेडकर व बजाज चौकात विशेष मोहीम राबविली. यात चुकीच्या बाजूने वाहने चालविणाऱ्या १४८ धारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. यात एक आॅटो व चार कारचा समावेश होता. शिवाय बाजार परिसरातील नो-पार्किंगमध्ये वाहने उभ्या करणाऱ्या ५५ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. यात सर्व दुचाकी धारकांचा समावेश आहे. शुक्रवारीही शहरात ९४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. काही वर्षांपूर्वी बाजारपेठेत पार्किंगची पी-वन, पी-टू ही सिस्टीम लागू करण्यात आली होती. यात काही दिवस रस्त्याच्या एका बाजूने तर काही दिवस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वाहने उभी करावी, अशा सूचना होत्या. ही पद्धत गुरव यांनी पुन्हा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.