शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

शहरातील २९ दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत साडेतीन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. व्यावसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता अटी, शर्थींवर तसेच नियमांचे पालन करूनच दुकाने उघडण्याची परवानगी दिली. परंतु, काही व्यावसायिकांकडून मात्र, नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून आले.

ठळक मुद्देउपाययोजनांचा दिसून आला अभाव : शहर पोलिसांनी केला दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण बघता शहरातील व्यावसायिकांना सोशल डिटन्सिंगचे पालन करूनच प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी दिली होती. पण, काही व्यवसायिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास शहरातील २९ व्यावसायिकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १४ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत साडेतीन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. व्यावसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता अटी, शर्थींवर तसेच नियमांचे पालन करूनच दुकाने उघडण्याची परवानगी दिली. परंतु, काही व्यावसायिकांकडून मात्र, नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून आले.दुकानांसमोर पाच फूट अंतरावर आळे करून त्यामध्येच ग्राहकांना उभे ठेवून सोशल डिस्टन्सिंग पाळणे, दुकानात होणारी गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, तोंडाला मास्क लावणे आदी नियम पाळूनच व्यावसायिकांनी आपले प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली होती. परंतु, बुधवारी सकाळच्या सुमारास नियोजित वेळेपूर्वीच दुकाने उघडल्याने तसेच दुकानांमध्ये गर्दी करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, सोशल डिस्टन्स न राखणाऱ्या लक्ष्मण गणेश पेटकर, मोहम्मद शफी, मोमीन शेख, सुनिल सवई, कांता मोरे, समीर खान पठाण, सुनिता ज्ञानेश्वर लोखंडे, शेख मुबारक, अंकुश देवठे, संजय मोरेश्वर बाकडे, माणिक वारसकर, अनिल माधव उमाटे, इंदू डहाके, विनोद नारायण नागतोडे, मनिष उमाटे, नरेंद्र देवढे, राजेंद्र भस्मे, दिनेश थूल, कल्पना रामटेके, मुरली उईके, शेख रुस्तम शेख लकी, पुरुषोत्तम अशोक अग्रवाल, रोहीत इंगोले, शैलेश मिराशी, मोहन उघडे, शेख नईम मेहमूद शेख, उमाकांत डहाके, शादाब शेख मेहमूद शेख, संजय भोयर अशा २९ व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रूपये वसूल करण्यात आला. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.चौका-चौकांत युवकांचे टोळकेशहरातील बॅचलर रोड, आर्वीनाका परिसर, रामनगर परिसर, शास्त्री चौक, सर्कस मैदान, लोक विद्यालय शाळेचे मैदान आदी विविध ठिकाणी रात्रीच्या सुमारास युवकांचे टोळके मोठ्या संख्येने बसून असताना पोलिसांनी याकडे लक्ष देत अशांना समज देत त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.काही उपहारगृहांमध्ये जेवणावळी सुरूचशहरातील हॉटेलचालक, उपहारगृह तसेच रेस्टॉरेंट मालकांना सायंकाळी सात वाजेपर्यंतच पार्सल सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी आहे. पण, काही हॉटेलमालकांनी रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने शहर पोलिसांनी शारातील पाच हॉटेल, भोजनावळींना सील ठोकले होते. पण, अजूनही शहरातील अनेक हॉटेल, उपहारगृहांमध्ये रात्रीच्या जेवणावळी सुरू असून त्याकडेही पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या