शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोटांच्या ठशांवरून निघेल आता आरोपीची कुंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 10:44 IST

जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याकरिता वर्धेत विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रभावी दारूबंदीचे प्रयत्न वर्धेत विशेष यंत्रणा कार्यान्वित

अभिनय खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याकरिता वर्धेत विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.आरोपीचे आधार संलग्न ठसे बायोमेट्रीकद्वारे उमटविताच त्याची गुन्ह्याबाबतची कुंडली समोर येणार आहे. ही नवी यंत्रणा गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्याकरिता लाभदायक ठरणार आहे.प्रभावी दारूबंदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये आरोपीला अटक केल्यानंतर आधार संलग्न बायोमेट्रीकद्वारे त्याने दाखल केलेल्या वैयक्तीक बंधपत्राची माहिती उपलब्ध होत आहे.गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमान्वये नोंद झाल्यास किती रक्कमेचे बंधपत्र घेतले, जमानतदाराची संपूर्ण माहिती व आरोपीवरील गुन्ह्याची अद्यावत माहिती उपलब्ध होत आहे. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत या प्रणालीद्वारे दारूबंदीचे गुन्हे दाखल झालेल्या २ हजार १४५ आरोपींची नोंद झाली. १० आरोपींना शिक्षा झाल्या. १२ आरोपी शिक्षेला पात्र ठरले आहेत. इतर गुन्हेगारांचीही हिस्ट्री आरोपीच्या बोटाचे ठसे घेताच केवळ दारूबंदीच नाही तर त्याच्यावर असलेल्या इतर गुन्ह्यांचीही माहिती यातून मिळणार आहे. याच प्रकारातून चोरी, हत्या, दरोडे यासह विविध गुन्ह्यातील आरोपींचीही माहिती जिल्हा प्रशासन ठेवत आहे. याचा लाभ गुन्हे उघड करण्याकरिता होत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गतवर्षी सुमारे ६ हजार ७०० तर यंदा विविध गुन्ह्यात अटकेतील सुमारे १० हजार ५०० आरोपींच्या बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान