शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या पोलिसांना वाकुल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:56 IST

बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य आरोपी मंगेश साठे हा बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत आला असल्याची पोलिसांना माहिती मिळताच बँकेला घेराव घातला; .....

ठळक मुद्देबनावट सोने तारण प्रकरण : अटकपूर्व जामीन घेवून दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य आरोपी मंगेश साठे हा बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत आला असल्याची पोलिसांना माहिती मिळताच बँकेला घेराव घातला; पण आरोपीला सुगावा लागताच तो चारचाकी वाहनात बसून पसार झाला. यात पोलिसांची पळापळ झाली. दोन तासाने तो परत बँकेत आल्याची माहिती मिळताच ठाणेदार निशीकांत रामटेके यांनी अटकेचा प्रयत्न करताच त्याने अटकपूर्व जामीन दाखल केला. यामुळे खरांगणा पोलीस ठाण्यात तीन तास चांगलाच गोंधळ उडाला.खरांगणा येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत ५ कि़ ८३९ ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून एक कोटी ८९ लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी शाखा व्यवस्थापक गणेश बाजीराव तईकर यांनी पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी सोनारासह फसवणूक झालेल्या १७ लोकांवर कलम ४२०, ४१८,४७१,४०८, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात मुख्य आरोपी येथील मंगेश साठे असल्याचे समोर आले. त्याच्या शोधात खरांगणा पोलिसांनी दरम्यानचे काळात नागपूर, यवतमाळ येथे शोध घेण्याचा प्रयत्न केला होता पण आरोपी गवसला नव्हता. गुरुवारीही पोलीस नागपुरात जावून आले.दरम्यान शुक्रवारी सकाळी मंगेश साठे हा बँकेत आला असण्याची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेकडे धाव घेतली. याची माहिती मिळताच आरोपीने पोलिसांना वाकुल्या दाखविण्यासाठी मुद्याम पसार होण्याचे नाटक केले. पोलीस वाहनाने पाठलाग केला पण तोपर्यंत आरोपी पसार झाला. यात पोलिसांची नाहक पळापळ झाली. अखेर काही तासाने आरोपी मंगेश साठे हा बँकेत पुन्हा आल्याची खबर मिळताच धावाधाव करून पोलिसांनी बँक गाठली. ठाणेदारांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने अटकपूर्व जामीन अर्ज ठाणेदारांना दाखवला व नाट्यावर पडदा पडला.आरोपी मंगेश साठेने मुद्दाम पळण्याचे नाटक केले. त्याचा कालही नागपुरात शोध घेतला; पण ठावठिकाणा लागला नाही. आज तो बँकेत आल्याची माहिती मिळताच बँकेला घेराव घालत असल्याची कुणकुण लागताच तो चारचाकी वाहनाने पसार झाला व पुन्हा काही तासाने तो बँकेत दाखल झाला. याची माहिती मिळताच परत बँकेत जात त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने न्यायालयाचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज दाखवला.- निशीकांत रामटेके, ठाणेदार, खरांगणा