शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पवनारप्रमाणेच वरूडला करणार आदर्श गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:15 IST

सेवाग्राम-पवनार या दोन ऐतिहासिक गावांना जोडणारे वरुड गाव विकासापासून वंचित आहे. या गावाचाही समतोल व सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर यांची ग्वाही : नागरी सुविधांसाठी निधी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम-पवनार या दोन ऐतिहासिक गावांना जोडणारे वरुड गाव विकासापासून वंचित आहे. या गावाचाही समतोल व सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. पवनार व सेवाग्रामप्रमाणेच वरूड आदर्श गाव करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी वरुड येथे आयोजित कार्यक्रमात दिली.आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष प्रयत्नातून वरुड गावासाठी २५ लक्ष रुपयांचा नागरी सुविधा विकास निधी मंजूर करण्यात आला. या निधीअंतर्गत होणाऱ्या बांधकामाचा प्रारंभ आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वासुदेव देवढे तर प्रमुख अतिथी पं.स सभापती महानंदा ताकसांडे, ग्रा.पं. सदस्य सुनील फरताडे, किरण धवणे, रंजना डाहुले, रत्नकला मटाले, वैशाली शिंदे, अरुण फुलझेले, अरुणसिंग ठाकुर, प्रमोद राऊत, माजी जि.प. सदस्य सुनीता ढवळे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. पंकज भोयर म्हणाले, वरुड गाव पवनार व सेवाग्राम आश्रमाच्या मध्यभागी आहे. या गावात अनेक समस्या असून त्या दूर करण्याचा प्रयत्नही केला जाईल. गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. गावात उत्तम दर्जाचे क्रीडांगण व्हावे यासाठी भविष्यात पुढाकार घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच वासुदेव देवढे यांनी केले. आ.डॉ. पंकज भोयर यांनी आतापर्यंत गावाच्या विकासासाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला. नागरी सुविधा विकास निधीतून सुधीर चिंचोळकर यांच्या घरापर्यंत रस्ता, श्रीराम पटेल ते प्रकाश पाटील, दिनेश नासरे ते प्रतीक हॉटेल, महादेव कळसाईत ते सिमेंटरोडपर्यंत रस्ता तयार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन विलास तरोटकार यांनी केले तर आभार ग्रा.पं. सदस्य सुनील फरताडे यांनी मानले.कार्यक्रमाला अजय वरटकर, ग्रामविकास अधिकारी चांदुरकर, रामकिशन वरले, विलास तरोटकर, राजू तळवेकर, अनंता भावरकर, अमित येतेकर, चेतन वरले, अमित बावणे, हेमंत जामणकरे, सुधीर चिंचोळकर, जगदीश डोळसकर, विनायक तपासे, अशोक बावणे, सौरभ भोयर, रेखा ठाकुर, शुभांगी चिंंचोळकर, मनीषा मुंगळे आदींनी सहकार्य केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.