शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योजना कामगाराबाबत केलेल्या घोषणेनुसार शासन आदेश त्वरित काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:42 IST

योजना कामगाराबाबत केलेल्या घोषणेनुसार शासन आदेश त्वरित काढून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी अंगणवाडी सेविकांनी बजाज चौकातून मोर्चा काढला. मोर्चा दुपारी १ वाजता जि.प. कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देमागणी : अंगणवाडी सेविका धडकल्या मिनी मंत्रालयावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : योजना कामगाराबाबत केलेल्या घोषणेनुसार शासन आदेश त्वरित काढून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी अंगणवाडी सेविकांनी बजाज चौकातून मोर्चा काढला. मोर्चा दुपारी १ वाजता जि.प. कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन जि.प. प्रशासनाला सादर केले.दरम्यान, निवेदनाची प्रत जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधितांना पाठविण्यात आली आहे. बजाज चौकातून निघालेल्या मोर्चाने इतवारा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग जि.प. कार्यालय गाठले. पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या द्वारासमोर आंदोलकांना अडविल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, शालेय पोषण आहार कर्मचाºयांना किमान समाधानकारक वेतन द्यावे. ३३ महिला खासदार पार्लमेंट कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा. आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन कायद्यापमाणे एनएचएम व पीआयपीमध्ये केलेल्या शिफारशीनुसार आशांना १७,२०० रुपये तर गटप्रवर्तकांना २५,००० रुपये एकत्रित वेतन द्यावे. अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार त्वरित आदेश काढावे. अंगणवाडी कर्मचाºयांना आजारपणाची रजा द्यावी आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. आंदोलनात दिलीप उटाणे, मनोहर पचारे, विजया पावडे, वंदना कोळणकर, असलम पठाण, गजेंद्र सुरकार, गुणवंत डकरे, ज्ञानेश्वर डंभारे, मैना उईके, मंगला इंगोले, विमल कौरती, सुनंदा आखाडे, शोभा तिवारी यांच्यासह अंगणवाडी सेविका सहभागी होत्या.