शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

निवडणुकीच्या कामातील शिक्षकांची मुख्याध्यापकाकडून गैरहजेरी

By admin | Updated: October 28, 2015 02:21 IST

नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या कामाकरिता शाळेत हजर नसलेल्या शिक्षकाची शाळेत गैरहजेरी लावण्याचा प्रकार येथील जिल्हा परिषदेच्या उबदा शाळेच्या मुख्याध्यापकाने केला.

मुख्यध्यापकावर कारवाई करा : शिक्षक संघाचे निवेदनसमुद्रपूर : नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या कामाकरिता शाळेत हजर नसलेल्या शिक्षकाची शाळेत गैरहजेरी लावण्याचा प्रकार येथील जिल्हा परिषदेच्या उबदा शाळेच्या मुख्याध्यापकाने केला. मुख्याध्यापकाच्या या नियमबाह्य कामाची शिक्षण विभागात चांगलीच चर्चा सुरू आहे. समुद्रपूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक १ नाव्हेंबरला होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्थानिक तहसीलदार, काम पाहत आहेत. या कामाकरिता आवश्यक सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करून नियुक्ती करण्यात आली. यानुसार जि.प. उबदा शाळेतील सुनील लोडे व दिलील झाडे या दोन शिक्षकांची मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून निवडणूक पथकात अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली. तसे आदेश शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत संबंधिताला पोहचता केला.नगरपंचायत निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण १७ आॅक्टोबरला होते. त्यासंबंधी नियुक्त शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख यांना १६ आॅक्टोबरलाच माहिती देत अवगत केले. असे असताना मुख्याध्यापक यु.जी. राठोड यांनी या दोनही शिक्षकांची हजेरीपटावर गैरहजर नोंद करून प्रकरण शिक्षणविभागाकडे प्रस्तावित केले. या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी शिक्षक संघाने निवदेनातून केली आहे.