शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! महिलेच्या पोटात १० किलो वजनाचा मांसाचा गोळा

By admin | Updated: August 23, 2016 02:03 IST

पोटात सतत दुखत असल्याच्या कारणाने दाखल झालेल्या महिलेची तपासणी केली असता तिच्या पोटात

वर्धा : पोटात सतत दुखत असल्याच्या कारणाने दाखल झालेल्या महिलेची तपासणी केली असता तिच्या पोटात मांसाचा गोळा तयार झाल्याचे समोर आले. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नसल्याने सदर महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली. यावेळी तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून मांसाचा गोळा काढण्यात आला. या गोळ्याचे वजन केले असता ते १० किलो भरल्याने सारेच अवाक् झाले. शासकीय रुग्णालय म्हणताच अनेकांकडून तोंड वाकडे केले जाते. वर्धेत मात्र याच शासकीय रुग्णालयात अवघड शस्त्रक्रीया करून एका गरीबाचे प्राण वाचविल्याचे समोर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातही रुग्णांचे प्राण वाचू शकते, असे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने दाखवून दिले. आहे. सध्या वर्धा सामान्य रुग्णालय डॉ. कृष्णा शेंडे, डॉ. कपूर, डॉ. कपिल, डॉ. सालवे यांची टीम कार्यरत आहे. या चार डॉक्टरांच्या चमूने ही अवघड शस्त्रक्रीया केली. आर्थिक बाजू कमकुवत असलेले रुग्णच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून आले आहे. याच परिस्थितीचा सामना करीत असलेली शेकापूर येथील निलिमा बोथरे नामक महिला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झाली होती. सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांच्या या चमूचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, अतिरिक्त शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. कळमकर यांनी मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी) दुर्बिणीद्वारे दुसरी शस्त्रक्रिया ४याच काळात आर्वी येथील रुग्णालयात प्रसूतीच्या कारणाने दाखल झालेल्या ममता ठाकरे या महिलेवरही दुर्बिणीने शस्त्रक्रिया करून तिचेही या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राण वाचविले आहे. ममता हिच्या प्रेगनेंसी ट्यूब रूप्चर होऊन सुमारे दोन लिटर ब्लड पोटामध्ये जमा झाले व तिच्या जीवितास धाका निर्माण झाला. या स्थितीत तिला कुठे हलविणे शक्य नसल्याने डॉ. कृष्णा शेंडे व त्यांच्या टिमने शस्त्रक्रीया केल्यामुळे रुग्णाचे प्राण वाचु शकले. त्यांनी ही शसत्रक्रीया दुर्बिणीच्या सहायायाने केल्याचे सांगण्यात आले आहे.