शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल माफीच्या मागणीसाठी ‘आप’चे ताला ठोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

वीज दरवाढ तातडीने मागे घेण्यासह ३० टक्के दर कपात करण्याबाबत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोनवेळा निवेदने सादर करून शासनाचे लक्ष वेधले. क्रांतिदिनी पालकमंत्री सुनील केदार यांना घेराव घालण्यात आला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले.

ठळक मुद्देसरकारविरुद्ध घोषणाबाजी : शासनाला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन काळातील २०० युनिटपर्यंत वीज देयक माफी व वीज दरवाढ मागे घेऊन ३० टक्के दरकपातीचे आश्वासन पूर्ण करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावेत, यासाठी आम आदमी पक्षाने गुरुवारी बोरगाव (मेघे) येथील वीज महावितरण कार्यालयासमोर सकाळी १० वाजता ‘ताला ठोको’ आंदोलन करण्यात आले.वीज दरवाढ तातडीने मागे घेण्यासह ३० टक्के दर कपात करण्याबाबत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोनवेळा निवेदने सादर करून शासनाचे लक्ष वेधले. क्रांतिदिनी पालकमंत्री सुनील केदार यांना घेराव घालण्यात आला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले.पावसाळी अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली होती. परंतु सरकारसुद्धा सुशांत, रिया आणि कंगणा यांच्या विळख्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे कदाचित राज्यातील महामारी आणि त्यामुळे संकटात असलेल्या जनतेबद्दल सरकार उदासीन असल्याचे दिसून आले. त्यामुळे कदाचित राज्यातील महामारी आणि त्यामुळे संकटात असलेल्या जनतेबद्दल विचार करण्याची सुबुद्धी सरकारला मिळाली नाही असे दिसून येते. आंदोलनात निदर्शने, वीज दरवाढ माफीबाबत घोषणाबाजी, प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली.तसेच आंदोलनादरम्यान मुख्य अभियंता यांच्याशी आपच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. आपल्या मागण्या व जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवतो असे आश्वासन अभियंत्यांच्यावतीने देण्यात आले. आंदोलन शांततमय मार्गाने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंत्यांमार्फत शासनाा पाठविण्यात आले. आंदोलनात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी प्रमोद भोमले, नितीन झाडे, अविनाश श्रीराव, हर्षल सहारे, तुळशीराम वाघमारे, रवी बारहाते, विजय गव्हाणे, नामदेव गुजरकर, रमेश खुरगे, मयूर राऊत, योगेश ठाकूर, रवींद्र साहू, विलास चुटे, ममता कपूर, प्रीती जांभुळकर, पूनम गुल्हाणे, अजय गुल्हाणे, अक्षय राऊत, नीलेश लाटे, शिवाजी टाले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.अशा आहेत प्रमुख मागण्याकोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीज बिल माफीची घोषणा करावी. वीज महावितरण कंपनीकडून १ एप्रिलपासून करण्यात आलेली वीजदरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे ३०० युनिटपर्यंत ३० टक्के स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, राज्य सरकारचा १६ टक्के अधिकार आणि वहन कर रद्द करण्यात यावा, वीज कंपन्यांचे कॅग ऑडिट करण्यात यावे. कोविडदरम्यान भरमसाठ दिलेले वीजबिल मागे घेऊन मागील वर्षी याच कालावधीत जे देयक आले होते, त्याप्रमाणे महिनेवारीचे सुधारित जुन्याच दराप्रमाणे वीज देयक देण्याचे आदेश द्यावेत आदी मागण्या आम आदमी पक्षाने केल्या.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीelectricityवीज