वर्धा : कापूस वेचून घरी परतलेली अल्पवयीन मुलगी बोर तोडत असताना तिला बळजबरी एकांतात नेत तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पांडुरंग उर्फ पंड्या गजानन पचारे असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.
अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपी पांडुरंग उर्फ पंडया गजानन पचारे यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ०६ सह कलम १८ नुसार पाच वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ४५० अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावस. भादंविच्या कलम ३२३ अंतर्गत सहा महिन्यांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारासावाची शिक्षा ठोठावली. शिवाय पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून सात हजार रुपये देण्याचे आदेशित केले आहे.गजानन दराडेंनी केला होता तपासमुलीवर अत्याचार झाल्याची घटना उजेडात येताच पीडितेच्या कुटुंबियांनी तातडीने खरांगणा पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीची दखल घेत गुन्ह्याची नोंदही घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन एस. दराडे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.अकरा साक्षदारांची तपासली साक्षया प्रकरणी शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून किशोर अप्तुरकर यांनी काम पाहिले. शासनातर्फे एकूण अकरा साक्षदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीशांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.