शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय औषधाच्या अपहाराच्या चौकशीसाठी समिती गठित होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीने एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०३७ बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील बारा जिल्ह्यांना पुरवठा केला आहे. या अधिकृत एजन्सीने या बॅचच्या २ लाख ४७ हजार १९८ ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा पुरवठा केला असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात तब्बल ९० शासकीय ऑक्सिटोसीन इंजेक्शनसह इतर शासकीय औषधसाठा सापडल्याने आणि त्याच बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील बारा जिल्ह्यांना पुरवठा झाल्याने शासकीय औषधाच्या अपहाराचे केंद्र शोधल्यास गैरप्रकार करणाऱ्यांची मोठी टोळीच गळाला लागण्याची शक्यता असल्याची बाब राज्य पर्यवेक्षकीय मंडळ व पीसीपीएनडीटीच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना पटवून दिली आहे. शिवाय त्यांनी याप्रकरणी राज्यस्तरीय चौकशी समिती गठित करण्याची मागणी निवेदनातून ना. शिंगणे यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी सल्लामसलतीअंती ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन डॉ. मिरगे यांना ना. शिंगणे यांनी दिले आहे.त्या ऑक्सिटोसीनचा बारा जिल्ह्यांना पुरवठा-   गर्भवती महिलेला प्रसुतीकळा येण्यासह प्रसुती झाल्यावर महिलेचा रक्तस्त्राव थांबविण्यासाठी ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा वापर केला जातो. कदम हॉस्पिटलमधून जप्त करण्यात आलेले एमएफजी कंपनी हेल्थ बायोटेक नालागड, बड्डी जि. सोलन, हिमाचल प्रदेश एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०३७ बॅच क्रमांकाचे शासकीय ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा वर्धासह, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना एका एजन्सीच्या माध्यमातून पुरवठा करण्यात आला आहे.

एजन्सीने केला २.४७ लाख ऑक्सिटोसीनचा पुरवठा

-   राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीने एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०३७ बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील बारा जिल्ह्यांना पुरवठा केला आहे. या अधिकृत एजन्सीने या बॅचच्या २ लाख ४७ हजार १९८ ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा पुरवठा केला असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

मुख्य आरोपी डॉक्टर दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत-    शासकीय औषधाच्या अपहाराचे केंद्र शोधण्याच्या उद्देशाने आर्वी पोलिसांनी अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम व रेखा यांचे पती डॉ. निरज कदम यांची नव्या जोमाने सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. पण याच पोलीस कोठडीदरम्यान या दोन्ही आरोपींनी त्यांच्या खासगी रुग्णालयात शासकीय औषध कुठून आले, याची कुठलीही ठोस माहिती पोलिसांना दिली नाही. सध्या डॉ. रेखा आणि डॉ. निरज कदम हे डॉक्टर दाम्पत्य न्यायालयाच्या आदेशान्वये न्यायालयीन कोठडीत असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicineऔषधं