शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसएमडब्ल्यू इस्पात’च्या सात अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अल्पवयीन कामगारांना भर उन्हात लावले काम

By रवींद्र चांदेकर | Updated: May 30, 2024 19:49 IST

अल्पवयीन कामगारांना कामावर ठेवून भर उन्हात काम करून घेतल्याचा ठपका 

देवळी (वर्धा) : येथील औद्योगिक वसाहतीतील एसएमडब्लू इस्पात प्रा. लि. कारखान्यातील दोन अस्थायी कामगारांचा मंगळवार रोजी एकाच दिवशी मृत्यू झाला. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याची शंका उपस्थित करून तपासला दिशा देण्यात आली. यात ‘एसएमडब्लू इस्पात’च्या सात अधिकाऱ्यांसह मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मृतात एक कामगार अल्पवयीन असल्याने पोलिसांनी याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून कारखाना प्रशासनाला तसेच मनुष्यबळ पुरविणाऱ्या ठेकेदाराला दोषी पकडले आहे. यातील १७ वर्षीय अल्पवयीन कामगार रितीक कामडी याच्या मृत्यू प्रकरणात एसएमडब्लू इस्पात कारखान्याच्या सात अधिकारी आणि कंत्राटदाराविरुद्ध भादंवि कलम ३०४ अन्वये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय भादंवि कलम ३४ सहकलम १४, बालकामगार अधिनियम सहकलम ९२ व कारखाना अधिनियमाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत अमित मातकर याच्या मृत्यू प्रकरणात भादंवि ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एसएमडब्लू इस्पात मॅनेजमेंटचे मनू जॉर्ज, प्रतीक बिंदल, आशीष भट, ब्रिजेश यादव, श्याम मुंदडा, रमेश नाथ, प्रसाद कुकेकर तसेच कंत्राटदार हर्षल राजू गायकवाड रा. देवळी यांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या आरोपींमध्ये कारखान्याचे सीईओ, प्लांट हेड, एचआर तसेच इतर अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने चर्चेला उधाण आले. याआधी कारखाना प्रशासनावर अशा पद्धतीची कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत केवळ कंत्राटदार हर्षल गायकवाड याला अटक करण्यात आली होती. उर्वरित काही आरोपी पोलिस ठाण्यात उपस्थित असतानासुद्धा त्यांना अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे मृतांच्या दोन्ही कुटुंबीयांत अस्वस्थता दिसून आली. वैद्यकीय सेवा पुरविण्यास लावला वेळ१७ वर्षीय अल्पवयीन कामगार रितीक ऊर्फ रोशन प्रकाश कामडी याला नियमबाह्यरीत्या कामावर घेतल्याचा तसेच त्याच्याकडून भर उन्हात अवजड काम करून घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमित प्रमोद पातकर (२१) याच्याबाबत कारखाना प्रशासनाचा निष्काळजीपणा तसेच वैद्यकीय सेवा देण्यात वेळ घालविल्याचा ठपका ठेवण्यात आला. सोबतच दोन्ही मृत्यूसाठी कारखाना प्रशासनाला दोषी ठरविण्यात आले. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण, पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :wardha-pcवर्धा