शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत तीन केंद्रांवर ९९.३५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:24 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघाकरिता वर्धेत सोमवारी मतदान झाले. यात वर्धा जिल्ह्यातील तीन केंद्रांवर तब्बल ९९.३५ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देविधान परिषद निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधान परिषदेच्या निवडणुकीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघाकरिता वर्धेत सोमवारी मतदान झाले. यात वर्धा जिल्ह्यातील तीन केंद्रांवर तब्बल ९९.३५ टक्के मतदान झाले. वर्धेत प्रारंभी मतदानाबाबत निरूत्साह दिसला तरी दुपारपर्यंत जिल्ह्यात मतदानाचा चांगलाच आलेख चढल्याचे दिसून आले. मतदानादरम्यान कुठेही कोणता अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती आहे.या तीन जिल्ह्यात आज झालेल्या निवडणुकीत ९९.७२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. याची मोजणी चंद्रपूर येथे २४ मे (गुरुवार) रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उभ्या असलेल्या चार उमेदावारांपैकी कोणाचे भाग्य यात साथ देईल हे मतमोजणीनंतरच कळणार आहे.वर्धा जिल्ह्यात वर्धा, आर्वी व हिंगणघाट येथे मतदान केंद्र होते. जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीकरिता ३०८ मतदारांना मतदान करावयाचे होते. यात १५३ महिला आणि १५४ पुरूष मतदार होते. त्यांना मतदान केंद्रावर आणण्याकरिता सकाळपासूनच विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यरत होते. वर्धा येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच आमदार, खासदार, नगराध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्षांची उपस्थिती असल्याचे दिसून आले.सायंकाळपर्यंत वर्धेत १०० टक्के मतदान झाले. वर्धा केंद्रावर १५१ मतदार होते. यात ७४ पुरूष आणि ७७ महिलांचा समावेश आहे. या सर्वांनीच आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. हिंगणघाट मतदान केंद्रावर एकूण ७७ मतदारांना मतदान करावयाचे होते. यात ४२ पुरूष आणि ३५ महिलांचा समावेश आहे. येथे शंभर टक्के महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर ९७.६२ टक्के पुरूष मतदारांनी मतदान केले. आर्वी केंद्रावर ८९ मतदारांना मतदान करावयाचे होते. येथे ३८ पुरूष आणि ४१ महिला मतदारांचा समावेश होता. येथे संपूर्ण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे समोर आले.यादी चुकलीशासनाने तयार केलल्या मतदार यादीत घोळ असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी वाढीव उमेदवार दिसले.हिंगणघाटात एकाची अनुपस्थितीहिंगणघाट मतदान केंद्रावर एका मतदाराने मतदान केले नाही. यामुळे तो कोण हे जाणून घेण्याकरिता सारेच उत्सूक आहेत. जिल्ह्यात सत्तेत असलेल्या की विरोधात असलेल्या पक्षाचा तो मतदार आहे, किंवा अपक्ष असलेला तो मतदार आहे या बाबत विविध चर्चा सुरू आहे.