शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नऊ कोटी रुपयांतून डॉ. आंबेडकर उद्यानाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:45 IST

शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानावर नगर पंचायतीच्यावतीने प्रारंभी अर्धा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एक उत्तम उद्यान म्हणून उदयास आलेल्या या जागेला राजकीय वितुष्टामुळे खिळ बसली.

ठळक मुद्दे१४ वर्षांपासून वाद होता न्यायालयात : शहरवासीयांची अद्ययावत उद्यानाची प्रतीक्षा संपली; वाद मिटविण्यात वर्धा पालिकेला यश

ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानावर नगर पंचायतीच्यावतीने प्रारंभी अर्धा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एक उत्तम उद्यान म्हणून उदयास आलेल्या या जागेला राजकीय वितुष्टामुळे खिळ बसली. नगर परिषदेत भाजपची एक हाती सत्ता आल्याने आता या उद्यानाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. अमृत योजना व सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत उद्यानाच्या विकासासाठी ९ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या उद्यानाच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.सन २००५ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सुनीता इथापे यांनी ३० लक्ष रुपये खर्च करून या उद्यानाचा विकास साधला होता. यावेळी नागरिकांना २ रुपये शुल्क आकारून उद्यानात जाण्याची सुविधा देण्यात आली होती. दरम्यान एका नगरसेवकाच्या कुटुंबाला शुल्क भरणे कमीपणा वाटल्याने वाद उफाळला. या वादातून पालिकेत ठराव घेत उद्यानाची देखभाल करणाºया महिला बचत गटाकडून कारभार काढण्यात आला होता. त्या काळापासून हा वाद कायमच होता.हा वाद न्यायालयात गेल्याने १४ वर्षांपासून उद्यानाला अवकळा आली होती. तब्बल १४ एकराच्या या परिसरात बेशरमची झुडपे, लव्हाळ, काटेरी झाडे उगवल्याने उद्यान की, झुडपी जंगल असा प्रश्न येथे येणाºयांना पत होता. आता ९ कोटी रुपयांतून त्याचा विकास होणार आहे. वर्धा शहरात राबविण्यात येणाºया अमृत योजनेतून ४ कोटी आणि सेवाग्राम विकास आराखड्यातून ५ कोटी रुपये या कामाकरिता मंजूर करण्यात आले आहे.या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी होणार आहे. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे व इतर नगरसेवक तथा पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.रंगीन कारंजे आणि चिमुकल्यांसाठी खेळणीशहरात सर्व सुविधायुक्त एकही बालोद्यान नसल्याने शहरात येणाºया पर्यटकांना बसण्याची व त्यांच्या पाल्यांना खेळण्यासाठी जागा नव्हती. ही बाब वर्धेकरांना बोचणारी होती. शिवाय येथे घडणाºया अवैद्य प्रकारामुळेही परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. या उद्यानाच्या विकासाची मागणी होत असल्याने नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी ही समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. ही समस्या मार्गी लागली असून या उद्यानात संगीतावर चालणारे रंगीन कारंजे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाक व फिरण्यासाठी आकर्षक ट्रॅक विविध प्रजातीची झाडे आणि चिमुकल्यांना खेळण्यासाठी विविध खेळणी लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या या उद्यानाला १४ वर्षांपासून अवकळा आली होती. या संदर्भात विविध संघटनांची आणि न्यायालयात गेलेल्या बचत गटाशी चर्चा करून हा वाद निवळण्यात यश आले. दरम्यानच्या काळात अमृत योजनेंतर्गत विकास कामे करताना हिरवळ निर्माण करण्याचा निर्णय असल्याने या उद्यानाचा कायापालट करण्याचे संकल्पना डोक्यात आली. तेथूनच अद्यावत उद्यान निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. याला पालकमंत्र्यांनीही पाठबळ दिले.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा